घरमुंबईBodybuilding competition : क्रीडा महाकुंभातील शरीर सौष्ठव स्पर्धेत दिव्यांगांचा सहभाग

Bodybuilding competition : क्रीडा महाकुंभातील शरीर सौष्ठव स्पर्धेत दिव्यांगांचा सहभाग

Subscribe

या स्पर्धेला 114 बॉडीबिल्डर यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे 7 दीव्यांग बॉडीबिल्डर यांनी ही विशेष उपस्थिती प्रदर्शित केली. त्यामुळे स्पर्धेत एक आगळेवेगळे आकर्षण निर्माण झाले होते. दिव्यांग बॉडीबिल्डरांनी उपस्थितांची आणि मान्यवरांची मने जिंकली, हे विशेष.

मुंबई : आपली संस्कृती व शिवकालीन खेळांचा वारसा जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धा रविवारी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडली. (Bodybuilding competition Participation of persons with disabilities in the bodybuilding competition in Sports Mahakumbha)

या स्पर्धेला 114 बॉडीबिल्डर यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे 7 दीव्यांग बॉडीबिल्डर यांनी ही विशेष उपस्थिती प्रदर्शित केली. त्यामुळे स्पर्धेत एक आगळेवेगळे आकर्षण निर्माण झाले होते. दिव्यांग बॉडीबिल्डरांनी उपस्थितांची आणि मान्यवरांची मने जिंकली, हे विशेष.

- Advertisement -

26 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मुंबईमध्ये विविध ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. हा क्रीडा महाकुंभ पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावत असून, स्पर्धेत स्पर्धकांकडून उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला जात आहे.
या स्पर्धेमध्ये लेझीम ,लगोरी, मल्लखांब, लंगडी, रस्सीखेच, विटी दांडू, कबड्डी, खो-खो ,फुगडी, ढोल ताशा पथक असे सांघिक खेळ तर मल्लखांब पावनखिंड दौड ,पंजा लढवणे, मल्लयुद्ध, दंड बैठक, दोरीच्या उड्या, अशा वैयक्तिक स्पर्धा होत आहेत.

हेही वाचा : उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

- Advertisement -

शिवकालीन खेळांचा वारसा जपण्यासाठी स्पर्धा

शिवकालीन खेळांचा वारसा, आपली संस्कृती जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी सदर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत.

हेही वाचा : Supriya Sule On Patel: खरंच, वय हा फक्त आकडा असतो; सुळेंचा पटेलांना टोला

सव्वादोन लाख खेळाडूंची नोंदणी

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उडया, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या 16 पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी तब्बल सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली. या स्पर्धा विविध वजनी गटात आणि वयोगटात घेण्यात येणार आहेत. आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव आणि ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -