भयंकर! प्रियकराने दुधासाठी पैसे दिले नाही, आईने बाळाला रस्त्यावर फेकले

बाळाच्या सुरक्षिततेच्या विचाराने पोलिसांनी बाळाला बालगृहाच ठेवले

boyfriend did not pay for the baby's milk, mother threw the baby on Mumbai 2 taki area stree

कोरोनामुळे सर्वांवर आर्थिक संकट ओढावले आहे. उपासमारीमुळे अनेकांचे हाल होत आहेत. मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या भयानक परिस्थितीत एक आई आपल्या पोटचा बाळाला रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेली. मुंबईतील २ टाकी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. बाळाचे नशीब म्हणून बाळाला काही झाले नाही.  सुदैवाने एका भल्या बाईला बाळ सापडल्याने बाळाचा जीव वाचला. त्या बाईने बाळाला दूध पाजून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून बाळाच्या आईचा शोध घेतला. बाळाला रस्त्यावर सोडण्यामागचे खरे कारण ऐकून पोलिसही हैराण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला रस्त्यावर सोडणाऱ्या २९ वर्षींय आईला पोलिसांनी बेलापूरमधून अटक केली. माहिलेचे आधी दोन विवाह झाले असून दोन्ही नवऱ्यांनी तिला सोडले. सध्या ती तिच्या प्रियकरासोबत बेलापूरमध्ये राहते. त्यांना एक बाळ देखिल आहे. तिच्या प्रियकराचा मुंबईच्या दोन टाकी परिसरात चिंधी बाजारात व्यवसाय आहे. महिला बाळाला घेऊन चिंधीबाजारात येत जात होती. तिने बाळाच्या दुधासाठी पैसे मागितल्यावर प्रियकर नाही बोला. या रागात महिला बाळाला रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेली.

दोन टाकी परिसरात चिंधीचा व्यवसाय करणाऱ्या रुपा माथुन दंतानी ही महिला शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चिंधी बाजारात चिंधी विकण्यासाठी आली. तिला अचानक बाळआच्या रडण्याचा आवाज आला. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या बाळाला पाहून रुपा यांनी गलेच बाळाला जवळ घेतले. बाळ खुप रडत असल्याने त्यांनी बाळाला दूध पाजले. बाळाचे पालक त्याला शोधत येतील या हेतूने रुपा दोन ते तीन तास तिथेच बसून राहिल्या. मात्र कोणीही न आल्यानंतर त्यांनी जे.जे.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी रस्त्यावर असलेले सीसीटिव्ही फुटेज आणि पोलिसांच्या खबऱ्यांच्या माध्यामातून बाळाच्या आईला बेलापूरमधून अटक केली. बाळाच्या आईला अटक केल्याने बाळाच्या सुरक्षिततेच्या विचाराने पोलिसांनी बाळाला बालगृहाच ठेवले आहे.


हेही वाचा – पहिल्या बायकोसोबत नवऱ्याची वाढली जवळीक; संतप्त झालेल्या दुसऱ्या बायकोने उचलले टोकाचे पाऊल