घरक्राइमपहिल्या बायकोसोबत नवऱ्याची वाढली जवळीक; संतप्त झालेल्या दुसऱ्या बायकोने उचलले टोकाचे पाऊल

पहिल्या बायकोसोबत नवऱ्याची वाढली जवळीक; संतप्त झालेल्या दुसऱ्या बायकोने उचलले टोकाचे पाऊल

Subscribe

देशात एकाबाजूला कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसांला ३ ते ४ हजारांहून अधिक लोकांचे जीव जात आहे. पण दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी घटना काही कमी होताना दिसत नाही आहेत. दिल्लीत भांडण झाल्यानंतर नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी ४३ वर्षी महिला आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. शनिवारी दिल्लीतील अलीपुरभागात ही घटना घडली. माहितीनुसार पहिल्या बायकोसोबत नवऱ्याची जवळीक वाढल्यामुळे संतप्त होऊन दुसऱ्या बायकोने हे पाऊल उचलले आहे.

या घटनेतील आरोपी महिलेचे नाव संगीता असून तिचा मित्राचे नाव निखिल जॉन उर्फ रिंकू आहे. सोमवारी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत बुधवारी पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या एक दिवसापूर्वी संगीताने पोलिसात तक्रार दाखल केली होती की, फूला रे म्हणजेच तिचा नवरा शनिवारपासून बेपत्ता आहे. मृतक व्यक्ती फूला रे भाजी विकत असे. संगीताने सोमवारी पोलिसांना सांगितले की, उत्तर-पश्चिम दिल्लीच्या खामपूर गावातील एका स्मशानात फूलाचा मृतदेह सापडला आहे.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेहावरील जखमा निर्देशनास आल्या. पोलीस उपायुक्त रंजन सिंह यांनी सांगितले की, मृतदेह दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे वाटत होते. मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती.

प्राथमिक तपासात समोर आले की, संगीताला भेटण्यापूर्वी फूला रे १२ वर्षापासून रेखा नावाच्या महिलेसोबत विवाहबद्ध होता. पहिल्या बायकोपासून त्याला तीन मुलं आहेत. त्यानंतर दिल्ली आल्यानंतर तो संगीतासोबत राहायला लागला, जिचा तलाक झाला होता. दोघांनी २०१७मध्ये लग्न केले होती. पण नंतर समजले की, रेखा आपल्या मुलांसोबत दिल्लीत आली आहे आणि फूला रेने संगीताला सोडले आहे. पहिली बायको रेखाने पोलिसांना सांगितले की, घटनेच्यापूर्वी संगीताचे फूला रे सोबत भांडण झाले होते. ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. डीसीपीने सांगितले की, चौकशी केल्यानंतर आरोपींना कबुली दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BKC येथे आढळला महिलेचा मृतदेह; लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -