घरमुंबईतळोजा जेलमध्ये 'अंग्रेज का जमाना', सकाळी लंच, संध्याकाळी डिनर!

तळोजा जेलमध्ये ‘अंग्रेज का जमाना’, सकाळी लंच, संध्याकाळी डिनर!

Subscribe

तळोजा जेलमध्ये २ हजार ९०० कैदी असून जेवणासाठीचा सर्वांसाठी सारखाच नियम आहे. जेलमध्ये असणारा कैदी कुणीही असला तरी नियम सर्वांसाठी एकच आहे. कैद्यांना जेवण देण्याअगोदर ते तपासण्यात येते. त्यानंतरच ते त्यांना देण्यात येते.

तळोजा जेलमध्ये २ हजार ९०० कैदी असून जेवणासाठीचा सर्वांसाठी सारखाच नियम आहे. जेलमध्ये असणारा कैदी कुणीही असला तरी नियम सर्वांसाठी एकच आहे. कैद्यांना जेवण देण्याअगोदर ते तपासण्यात येते. त्यानंतरच ते त्यांना देण्यात येते. एकाच वेळी सर्व कैद्यांना जेवण देण्यात येत असून त्यातील प्रत्येक कैदी आपल्या सोयीनुसार जेवण जेवतो. त्यांच्याच हितासाठी जेलमधील प्रत्येक बराकमध्ये हॉट पॉट सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेल्यानंतरही तळोजा जेलमध्ये कैद्यांसाठी ब्रिटिशकाळातील जेवणाच्या वेळा पाळल्या जात आहेत. त्यामुळे भारतातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जेवणाच्या वेळेआधीच तळोजा जेलमध्ये जेवण मिळत असल्याने हे जेवण चार ते पाच तासांनी पुन्हा गरम करावे लागत आहे. त्यामुळे ब्रिटिश गेले पण आपली वेळ मागे ठेवून गेल्याची चर्चा होत आहे. मुंबईतील भायखळा जेलमध्ये कैद्यांच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सूर्योदयानंतर केलेले जेवण गरम राहाण्यासाठी नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये हॉट पॉटचा पर्याय निवडण्यात आला आहे. हॉटपॉटद्वारे जेवण गरम करण्याची सुविधा राज्यातील सर्वच जेलमध्ये देण्यात येणार आहे. परंतु भारतातील जेवणाच्या सर्वसामान्य वेळेनुसार जेलमध्ये जेवण मिळाल्यास ते पुन्हा गरम करण्याची वेळ येणार नाही आणि कैद्यांनाही गरम जेवण उपलब्ध होईल. त्यामुळे दुपारी एक ते दीड वाजता तसेच रात्री आठ ते साडेनऊ या वेळेत जेवण उपलब्ध होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

भायखळा जेलमधील काही कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर येताच पुन्हा एकदा कैद्यांना देण्यात येणार्‍या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला. यावर खबरदारी म्हणून कैद्यांना देण्यात येणारे जेवण अगोदर तपासून घेतले जाते. त्यानंतरच कैद्यांना दिले जाते, असे तळोजा जेलचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी सांगितले. ब्रिटिश काळात कैद्यांना सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता असे दिवसातून दोनदा जेवण देण्यात येत होते. तीच पद्धत आजही जेलमध्ये राबवली जात आहे. सकाळी ८ला जेवण बनवायला सुरुवात झाल्यानंतर ते ९ पर्यंत कैद्यांपर्यंत पोहोचते. त्यानंतर पुन्हा पाच वाजता सायंकाळी कैद्यांना जेवण देण्यात येते.

भारतातील अनेक नागरिकांना दुपारी १ ते २ व रात्री ९ ते ११ या वेळेत जेवणाची सवय आहे. त्यातील काही नागरिक विविध गुन्ह्यांत जेलमध्ये कैदी झाल्यावर त्यांच्या जेवणाच्या वेळा बदलतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक कैदी सकाळी मिळणारे जेवण वेळेत जेवतात. मात्र सायंकाळी ५ वाजता मिळणारे जेवण हे रात्री उशिरा जेवतात. त्यासाठी मिळालेले जेवण भांड्यात, पिशवीत अथवा एखाद्या कपड्यात बांधून ठेवतात. त्यानंतर ते रात्री उशिरा शेकोटीत गरम करून खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेवणाची चव बदलते. जेवणाच्या वेळा बदलता येणे शक्य नसल्याने उपाययोजना म्हणून जेल प्रशासनाकडून जेलमधील प्रत्येक बराकीतील कैद्यांना हॉट पॉट सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -