घरमुंबईभिडेंची तक्रार करणारा शिवप्रतिष्ठानमुळे हैराण

भिडेंची तक्रार करणारा शिवप्रतिष्ठानमुळे हैराण

Subscribe

माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने 150 जणांना मुले झाली, असे वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी केली होती.

माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने 150 जणांना मुले झाली, असे वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी केली होती. याची दखल घेत नाशिक महापालिकेने संभाजी भिडे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता संभाजी भिडेंच्या श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून बोर्‍हाडे यांना त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे बोर्‍हाडे यांनी संगमनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

भिडे यांचे पुत्रप्राप्तीविषयीचे विधान गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेने भिडे यांना नोटीस पाठवली होती. परंतु त्यांनी ही नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे भिडेंविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला होता.

- Advertisement -

सोशल मीडियातून बदनामी, धमकी

या प्रकारामुळे संतापलेल्या श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गणेश बोर्‍हाडे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भिंडेच्या कार्यकर्त्यांनी बोर्‍हाडे यांची बदनामी सुरू केली आहे. अप्रत्यक्षपणे त्यांना धमकावले जात आहे. यासंदर्भात बोर्‍हाडे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, लेखी, तोंडी धमकी किंवा दमदाटी केल्यास संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्याचे बोर्‍हाडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -