घरमुंबईसाडेचार कोटीच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक

साडेचार कोटीच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक

Subscribe

सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दिपेश लक्ष्मण भगतानी या 37 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात मुकेश लक्ष्मण भगतानी आणि लक्ष्मण पुरुषोत्तम भगतानी या दोन आरोपींना फरार घोषित केले आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध आठहून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून या सर्व गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार निशांत शिरीष गांधी हे व्यवसायाने डॉक्टर असून ते पवईतील चांदीवली रोडवरल पंतरुतू अपार्टमेटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. आई, वडिल आणि भावांसोबत राहण्यासाठी त्यांना मोठ्या घराची आवश्यकता होती. त्यांना भगतानी क्रिशांग या कंपनीतर्फे चांदीवली परिसरात एक इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे समजले. त्यामुळे ते दिनेशसोबत ऑक्टोंबर 2012 रोजी कंपनीच्या सांताक्रुज येथील प्राईम प्लाझाच्या कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसाठी या इमारतीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅट बुकींग करताना त्यांनी 1 कोटी 62 लाख रुपयांपैकी 83 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कंपनीच्या नावाने दिला होता. धनादेश बँकेत वटताच त्यांना या रक्कमेची एक पावती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कुरिअरद्वारे फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर देण्यात आले होते.

- Advertisement -

त्यात त्यांना एक वर्षांत आयओडी प्राप्त झाली नाहीतर 15 टक्के व्याजाने भरलेली रक्कम परत देण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी इमारतीचे बांधकाम सुरु केले नव्हते, याबाबत विचारणा केल्यानंतर लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी बुधवारी दिपेश भगतानी याला पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यात तो सध्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -