घरमुंबईबिल्डरांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्यास सभागृहाची मंजुरी; भाजपचा मात्र विरोधच

बिल्डरांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्यास सभागृहाची मंजुरी; भाजपचा मात्र विरोधच

Subscribe

गुरुवारी सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला, तेव्हा भाजपच्या एकाही नगरसेवकाने विरोध केला नाही. त्यामुळे भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसलेल्या बिल्डरांना संजीवनी देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील प्रस्तवाला भाजपने केलेल्या विरोधाला न जुमानता शिवसेना, विरोधी पक्षाने बहुमताच्या जोरावर स्थायी समितीच्या मागील बैठकीत मंजूर केला होता. गुरुवारी हाच प्रस्ताव पालिका सभागृहात बिनविरोध मंजूर करण्यात आला. गुरुवारी सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला, तेव्हा भाजपच्या एकाही नगरसेवकाने विरोध केला नाही. त्यामुळे भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

रवी राजा यांनी विचारला भाजपला जाब

गुरुवारी हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीला आला असता भाजपचे नेते, नगरसेवक यांपैकी एकानेही विरोध केला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या बैठकीत याच प्रस्तावाला विरोध करणाऱ्या भाजपने सभागृहात का विरोध केला नाही? तेव्हापासून ते आजपर्यंतच्या कालावधीत असे काय घडले की भाजपने विरोध केला नाही? असे सवाल रवी राजा यांनी उपस्थित करत भाजपला जाब विचारला.

- Advertisement -

भाजपचा विरोध कायम – भालचंद्र शिरसाट

स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्तवाला भाजपने विरोध केला आणि आजही आमचा विरोधच आहे. परंतु, आज सभागृह कामकाज ऑनलाईन असताना नीटपणे ऐकायला येत नव्हते. तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या गडबडीत हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -