घरमुंबईकार्ड क्लोनिंग करणारी टोळी जेरबंद

कार्ड क्लोनिंग करणारी टोळी जेरबंद

Subscribe

कार्डचा डाटा चोरी करुन क्लोनिंगद्वारे करत होते फसवणुक. आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; विदेशी नागरिकासह सहाजणांना अटक करण्यात पोलिसांना यश. आतापर्यंत अनेक खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे उघड.

भारतीय आणि विदेशी बँक खातेदाराच्या डेबीट आणि क्रेडिट कार्डचा डाटा चोरी करुन क्लोनिंगद्वारे बोगस कार्ड बनवून त्याद्वारे फसवणुक करणार्‍या एका हायटेक आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका विदेशी नागरिकासह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कस्तुरराम तेजारामजी सोलंकी, मदनकुमार केवारामजी सुंदेसा, रमेश चंद्रन, दिपक पवनकुमार गेहलोत, चंदनसिंग नरपतसिंग राव, कोलवोले हकीम ऊर्फ आयो रफिऊ आदीगुन अशी या सहाजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी दहा मोबाईल फोन, चार लॅपटॉप, ९७ बोगस डेबीट-क्रेडिट कार्ड, दोन कार्ड रिडर, रायटर, एक पॉईट ऑफ सेल स्किमर, एक एटीएम स्वाईप मशिन आणि मिनी डाटाा कलेक्टर मशिन आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष पथकाची नियुक्ती

कस्तुराम सोलंकी आणि मदनकुमार सुंदेसा हे दोघेही न्यायालयीन तर इतर चारही आरोपी पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई शहरात खातेदारांच्या कार्डचा डाटा चोरी करुन बोगस कार्डद्वारे विविध एटीएममधून पैसे काढून फसवणुक होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

कशाप्रकारे केली अटक

नागपाडा परिसरात अशाच एका गुन्ह्यांची नोंद होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यातील तक्रारदाराचा मुलगा ग्रीसमध्ये कामाला आहे, त्याच्याकडे त्याचे क्रेडिट आणि डेबीट असताना त्याच्या बँक खात्यातून सव्वादोन लाख रुपये काढण्यात आले होते. या घटनेनंतर या पथकाने चौकशी करुन राजस्थान येथील एका दुकानातून बोगस कार्डद्वारे ही रक्कम काढण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने राजस्थान येथून कस्तुरराम सोलंकी आणि मदनकुमार सुंदेसा या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अशा प्रकारे फसवणुक करणारी एक हायटेक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी वेगवेगळ्या परिसरातून रमेश चंद्रन, दिपक गेहलोत, चंदनसिंग आणि एक नायजेरीयन नागरिक कोलवोल हकीम अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस डेबीट आणि क्रेडिट कार्ड, मोबाईल फोन स्वाईप मशिनसह इतर साहित्य जप्त केले. चौकशीत संबंधित आरोपी तामिळनाड येथे कार्ड क्लोनिंगकरीता कार्ड रायडर, रिडर मशिन चीनमधून आयात करुन ऑनलाईन शॉपिंगद्वारे देशभरात अनेक खातेदारांचे डाटा चोरी करुन त्यानंतर बोगस कार्डद्वारे ही फसवणुक करीत होते. या टोळीने आतापर्यंत विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -