घरमुंबईटिटवाळा- खडवली दरम्यान रेल्वे रूळाला तडे, मध्यरेल्वे ठप्प!

टिटवाळा- खडवली दरम्यान रेल्वे रूळाला तडे, मध्यरेल्वे ठप्प!

Subscribe

मध्यरेल्वेच्या प्रवाशांना आज सकाळी पुन्हा एकदा त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. टिटवाळा- खडवली दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या कल्याण ते कसारा या मार्गावरवरील रेल्वे बंद आहे. टिटवाळा- खडवली दरम्यान लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्यांचे मात्र हाल झाले आहेत.

या आधी रविवारीसुद्धा आंबिवली स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग करत असताना डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्याने ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. यावेळी ओव्हरहेड वायरचा खांबाला धडक बसून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तातडीने ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेत ते दुरुस्त करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला. तब्बल एक ते दीड तास रेल्वे उशीराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांना चांगलेच हाल सहन करावे लागले होते.

- Advertisement -

आज पुन्हा एकदा कल्याण-कसारा मार्गावर रूळाला तडे गेल्यामुळे मध्यरेल्वेची सकाळ रखडतच झाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -