घरदेश-विदेशचांद्रयान-२ मोहीम अंतिम टप्प्यात; इस्त्रो प्रमुखांची माहिती

चांद्रयान-२ मोहीम अंतिम टप्प्यात; इस्त्रो प्रमुखांची माहिती

Subscribe

'चांद्रयान -१' मोहिमेच्या यशस्वीतेनंतर भारत 'चांद्रयान -२' मोहिमेसाठी सज्ज असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

चांद्रयान, मंगलयान या यशस्वी मोहिमांनंतर इस्रोची चांद्रयान-२ मोहीम अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी, १५ जून रोजी ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

अंतराळामध्ये स्वतःचे स्थानक स्थापनार

‘चांद्रयान-२’ सोबतच आणखीन एक एक मोठी मोहीम हाती घेणार असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी सांगितले. अंतराळामध्ये स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची तयारी इस्रोने केली आहे. ह्युमन स्पेस मिशननंतर गगनयान मोहीम चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अंतराळात भारत स्वत:चे अंतराळ स्थानक तयार करण्याची तयारी करत असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

- Advertisement -

आगामी काळात सूर्य आणि शुक्र हे इस्रोचं लक्ष्य

दरम्यान, ‘चांद्रयान २’ यशस्वी करण्यासाठी इस्रोची यंत्रणा सज्ज झाली आहे. यानंतर इस्रो सूर्य आणि शुक्रच्या दिशेनं उड्डाण करणार आहे. मिशन चांद्रयानसाठी दहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अंतराळ क्षेत्रात भारतानं महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या असून येत्या काळात सूर्य आणि शुक्र हे इस्रोचं लक्ष्य असेल, असं सिंह यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -