घरट्रेंडिंगघाटकोपर दुर्घटना : असं कोसळलं चार्टर्ड विमान

घाटकोपर दुर्घटना : असं कोसळलं चार्टर्ड विमान

Subscribe

घाटकोपरमध्ये कोसळलेलं चार्टर्ड विमान नेमकं कुठून आलं होतं? हे विमान नक्की कसं कोसळलं? याविषयी सध्या विविध चर्चा होत आहेत.

घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलजवळ असलेल्या जीवदया इमारतीजवळ चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. अचानक मोठा आवाज होऊन आगीचे लोळ उसळल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ माजली. सर्वोदय हॉस्पिटलजवळच्या बांधकाम सुरु असलेल्या या इमारतीजवळ हे चार्टर्ड विमान कोसळलं. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळण्याची पुढील कारणे समोर येत आहेत.

असं पडलं विमान?

  • दुर्घटनाग्रस्त चार्टड प्लेन जुहूच्या खासगी विमानतळावरुन टेस्टिंगसाठी निघालं होतं   
  • घटनेच्या अगदी काही तास आधीच जुहूच्या विनामतळावरुन या विमानाने उड्डाण घेतले
  • सांताक्रुझ किंवा जुहू हवाई अड्ड्यावरुन उड्डाण घेणारी किंवा या ठिकाणी लँड होणारी विमानं सहसा घाटकोपरच्या पट्ट्यातूनच ये-जा करत असतात
  • यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर्स किंवा चार्टर्ड विमानांचा वापर असतो
  • VT-UPZ – KING AIR C90 हे विमान देखील याचप्रकारातील विमान होते
  • संबंधित विमान घाटकोपर पट्ट्यातून जात असताना ते कोसळले. घाटकोपरमध्ये ढगाळ हवामान असून, हलका पाऊसही पडत होता. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
  • संबंधित विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते आहे.

दरम्यान याबाबत कोणताच ठोस खुलासा करण्यात आला नसून, विमान नेमकं कशामुळे पडलं याचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

पाहा दुर्घटनेचा व्हिडिओ :

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -