घरमुंबईतो भूखंड आमचा नव्हताच सिडकोकडून कबुली

तो भूखंड आमचा नव्हताच सिडकोकडून कबुली

Subscribe

फेरीवाल्यांच्या नावाखाली तब्बल २५ कोटी रुपये किमतीचा भूखंड हडप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप नगरसेवकाचा डाव आपला महानगरने उघडकीस आणला असता सिडकोकडून सुरू असलेली या भूखंडाबाबतची कार्यवाही रद्द करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांच्या नावाखाली तब्बल २५ कोटी रुपये किमतीचा भूखंड हडप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप नगरसेवकाचा डाव आपला महानगरने उघडकीस आणला असता सिडकोकडून सुरू असलेली या भूखंडाबाबतची कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे सिडकोने स्पष्ट केले असून आपलं महानगरने हपापाचा माल गपापा या मथळ्याखाली दिलेल्या बातमीमुळे भूखंड संबंधितांकडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेल्याचे मत या प्रकरणी पाठपुरावा करणारे अजित अडसूळ यांनी व्यक्त केले आहे.

हा भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही रद्द करण्यात आल्याचे पत्र समाजसेवक अजित अडसूळ यांना सिडकोकडून देण्यात आले असता सर्वप्रथम त्यांनी महानगरचे आभार मानले. सिडकोकडून फेरीवाल्यांसाठी भूखंड देण्यात आलेला नसतानाही खारघर मधील भाजप नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी मोक्याच्या जागी असलेला कोट्यवधी रुपयांचा भूखंड दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या नावाखाली हडप करण्याचा प्रयत्न केला होता. हा भूखंड संस्थेच्या नावाखाली अधिकृत करण्यासाठी बाविस्कर यांनी सिडकोत गेल्या दोन वर्षापासून तगादा लावला होता.

- Advertisement -

सिडकोच्या ताब्यात नव्हताच भूखंड
तसेच एमआयडीसीच्या मालकीचा असलेला हा भूखंड सिडकोच्या घशात घालून त्याचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहितीही अडसुळे यांनी दिली. खारघर सेक्टर १५ मधील घरकुल आणि स्पगेटी सोसायटी जवळ एमआयडीसीचा भूखंड असून भूखंडाची किंमत आजमितीला २० ते २५ कोटीच्या जवळपास आहे. सिडकोकडून या भूखंडाचे भूसंपादन न झाल्याने आजही तो भूखंड एमआयडीसीकडेच आहे. दोन वर्षापूर्वी या भूखंडावर भाजप नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या नावाखाली मार्केट सुरु केले. हे मार्केट अधिकृत व्हावे म्हणून सिडकोकडे पाठपुरावा सुरु केला. सिडकोनेही कोणतीही माहिती न घेता हा भूखंड दुर्गामाता फेरीवाला संस्थेला दिल्याचे स्पष्ट केल्याने खळबळ उडाली. मात्र अधिक चौकशीत हा भूखंड सिडकोचा नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सिडको या भूखंडाबाबत आरक्षण देऊच कसे शकते असा प्रश्न निर्माण झाला होता. तर दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी अडसुळे यांनी सिडकोकडे केली होती. तरीही सिडकोकडून कोणतेही पाउल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणी अडसुळे यांनी एमआयडीसी कडे पत्रव्यवहार सुरु केला. त्यानंतर भूखंड हा आमचाच असल्याचा खुलासा एमआयडीसीकडून करण्यात आला. त्यानंतर घोटाळ्याची बातमी महानगरमध्ये प्रसिद्ध झाली असता अखेर सिडकोला भूखंडाबाबत केलेली नियमबाह्य कार्यवाही रद्द करावी लागली.

गेल्या अनेक वर्षापासून या विषयी पाठपुरावा करत असताना अनेक वर्तमानपत्रांनी याकडे कानाडोळा केला. त्याच वेळी आपला महानगरने परखडपणे भूखंड घोटाळ्याची बातमी छापली. त्यावेळी सिडकोत एकच खळबळ माजली आणि शेवटी त्यांना तो भूखंड रद्द करावा लागला.
अजित अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -

खारघर सेक्टर १५ मधील सर्व्हे नंबर ८९ ते ९२ मधील भूखंड सिडकोकडे ताबा प्राप्त नसलेला आहे. यातील काही जागेवर भाजीपाला मार्केट वसवण्यात आले असून त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. यावर चालणार्‍या सर्व कामकाजाला स्थगिती देण्यात आली आहे.
-प्रिया के, वरिष्ठ नियोजनकार (दक्षिण) ,सिडको

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -