घरमुंबईCigarette Smoking 'या' ठिकाणी केल्यास आता दंडासह होणार तुरुंगवास; स्मोकिंग झोनबद्दल जाणून...

Cigarette Smoking ‘या’ ठिकाणी केल्यास आता दंडासह होणार तुरुंगवास; स्मोकिंग झोनबद्दल जाणून घ्या…

Subscribe

मुंबई : अनेकांना चहासोबत सुट्टा म्हणजेच सिगारेट घेण्याची सवय असते. धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक असले तरीही प्रत्येकजण एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेऊन सुट्टा मारताना हमखास दिसतो. मात्र आता सार्वजनिक ठिकाणी कोणी सिगारेट ओढल्यास दंड भरावा लागू शकतो. रस्त्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणी धुम्रपान करताना पकडल्यास दंडा भरावा लागू शकतो किंवा तुरुंगातही जावं लागू शकतो. यासाठी धुम्रपान करताना नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. (Cigarette Smoking in Public Places Now Imprisonment with Fine Learn about smoking zones)

हेही वाचा – Breaking Aditya L-1 : भारताचा सूर्यनमस्कार; आदित्य एल-1 पोहचले निर्धारित पॉइंटवर

- Advertisement -

भारतीय दंड विधान (IPC) कलम 278 नुसार, कोणत्याही गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे हा गुन्हा आहे आणि यासाठी दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती गजबजलेल्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट प्यायल्यास त्यांच्याकडून 200 रुपये दंड आकारला जाऊ शकतो आणि हा दंड त्या व्यक्तीला जागेभरच भरावा लागणार आहे. तसेस इतर ठिकाणी हा दंड 1000 रुपयांपर्यंत आकारला जाऊ शकतो. मात्र तुम्ही जागेवर दंड भरला नाही तर तुम्हाला तुरुंगातही जावे लागेल. असे असले तरी जर तुम्ही मोकळ्या जागेत धुम्रपान करत असाल आणि तुमच्यामुळे जर कोणाला त्रास होत नसेल तर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

स्मोकिंग झोन आणि नियम जाणून घ्या…

सध्याचे धुम्रपानचे प्रमाण मोठ्या वाढले आहे, पण या गोष्टीचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्मोकिंग झोन तयार करण्यात आलाे आहेत. विमानतळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये स्मोकिंग झोन पाहायला मिळतात, मात्र आता ऑफीसमध्येही स्मोकिंग झोन तयार करण्यात आले आहेत आणि यासाठी काही नियमही आहेत. स्मोकिंग झोनमध्ये वेंटिलेशन असणे आवश्यक आहे. स्मोकिंग झोन अशा ठिकाणी असले पाहिजे जिथून धूर निघाल्यावर कोणालाही त्रास होणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – इतिहासाचा विपर्यास करणं टाळलं पाहिजे, असे म्हणत Sharad Pawar यांची ‘या’ नाटकावर अप्रत्यक्ष टीका

‘या’ ठिकाणी सिगारेट ओढता येणार नाही

हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, पार्क, रेस्टॉरंट, हॉटेल, सार्वजनिक कार्यालय, न्यायालयीन इमारत, शाळा, कॉलेज, ग्रंथालय, सार्वजनिक वाहतूक, स्टेडियम, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, बस स्टॉप, विमानतळ, रेल्वे स्टेशन अशा कोणत्याही ठिकाणी कोणतीही व्यक्ती सिगारेट ओढू शकत नाही. तसेच याठिकाणी कोणत्याही पद्धतीचे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.

सिगारेट ओढण्यात तरुणांसह तरुणींची संख्या मोठी

सिगारेट ओढल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला आपला जीवही गमवावा लागू शकतो, अशा सूचना सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेल्या दिसतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण बिनधास्त सिगारेट ओढताना दिसतात. काही जण दिवसाला 2 ते 3 सिगारेट ओढतात, तर काही जण अख्ख पाकीट रिकामं करतात. सिगारेट ओढण्यामध्ये आता तरुणांसह तरुणींचीही संख्याही मोठी आहे. आता तर ई-स्मोकिंगला तरुणाई प्राधान्य देताना दिसत आहे. सिगारेट ओढल्यामुळे कॅन्सर होऊन जीव जाऊ शकतो, हे माहित असूनही प्रत्येकजण सर्रास सिगारेट ओढताना दिसतो. त्यामुळे आपल्या इच्छेवर वेळीच नियंत्रण ठेऊन सिगारेट सोडल्यास आपण स्वत:ळा कॅन्सरपासून वाचवू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -