घरक्राइमMumbai Bomb Threat : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासह प्रमुख स्थळे बॉम्बने उडवण्याची...

Mumbai Bomb Threat : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासह प्रमुख स्थळे बॉम्बने उडवण्याची E-mailद्वारे धमकी

Subscribe

कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरसह मुंबईतील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याचा ई-मेल पोलिसांना आला. या धमकीनंतर पोलीस आणि बॉम्बशोध पथकाने तपास केल्यानंतर संशयास्पद काही आढळून आले नाही.

मुंबई : मुंबईतील एकाच वेळी अनेक संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल दिली आहे. मुंबई पोलिसांना ही धमकी ई-मेलद्वारे आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबई पोलिसांनी बॉम्बशोध पथक या प्रकरणाचा तपास सुरू करत आहे. पोलिसांना आलेल्या ई-मेलमध्ये कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरसह प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.

यानंतर कुलाबा, वरळीसह अनेक भागात मुंबई सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून ज्या ई-मेलमधून पोलिसांना धमकी आली होती. त्या ई-मेलचा तपास पोलीस करत आहेत. या धमकीनंतर पोलिसांनी संग्रहालयाची तपासणी केल्यानंतर संशयास्पद कोणतीही आढळून आले नाही. आता मुंबई पोलीस ज्या ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्या व्यक्तीचा शोध पोलीस करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Thane : ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा E-mail; पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात

मुंबई पोलिसांनी ई-मेलसंदर्भात माहिती दिली?

पोलिसांच्या माहितीनुसार, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरसह मुंबईतील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याचा ई-मेल पोलिसांना आला. या धमकीनंतर पोलीस आणि बॉम्बशोध पथकाने तपास केल्यानंतर संशयास्पद काही आढळून आले नाही. संग्रहालयात अनेक बॉम्ब ठेवले जातील आणि ते कधीही स्फोट होती, असे म्हटले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी संग्रहालयाच्या अवतीभवती बॉम्बशोध पथका बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुंबई पोलीस सायबर विभागाकडून ई-मेल पाठवणाऱ्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray यांनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या? Ajit Pawar यांचा सवाल

ठाण्यातील ज्यू धार्मियांचे प्रार्थनास्थळा बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल

नुकतेच ठाण्यातील ज्यू धार्मियांचे प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पोलिसांना 28 डिसेंबरला आला होता. पोलिसांनी मेलची दखल घेत प्रार्थनास्थळी बॉम्बशोध पथक पाठविले होते. पोलिसांना ई-मेल आल्यानंतर त्यांनी तातडीने शोध मोहीम राबवली. पण पोलिसांना त्या ठिकाणी काही संशयास्पद आढळून आले नाही.

हेही वाचा – Breaking Aditya L-1 : भारताचा सूर्यनमस्कार; आदित्य एल-1 पोहचले निर्धारित पॉइंटवर

RBIच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी

यापूर्वी आरबीआय कार्यालय (RBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) या यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हा धमकीचा ई-मेल खिलाफत इंडियाकडून आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -