घरमुंबईसंविधान बदलण्याच्या चर्चेवर भूमिका स्पष्ट करा; नाना पटोलेंची पंतप्रधानांकडे मागणी

संविधान बदलण्याच्या चर्चेवर भूमिका स्पष्ट करा; नाना पटोलेंची पंतप्रधानांकडे मागणी

Subscribe

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr. babasaheb ambedkar) यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस आणि भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय (Vivek Debroy) यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपाच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढाचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या विधानाशी भाजपा (BJP) आणि  नरेंद्र मोदी सहमत आहेत का? याचा पंतप्रधानांनी तत्काळ खुलासा करावा,  अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (17 ऑगस्ट) केली आहे. (Clarify positions on the debate on changing the constitution Nana Patole’s demand to the Prime Minister)

हेही वाचा – Jitendra Awhad : …आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेत; आव्हाडांनी बीडमधील सभेत व्यक्त केला विश्वास

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देशाला दिले आहे. सर्वांना समान हक्क, अधिकार आणि न्याय दिला. परंतु संविधान न मानणारे  काही लोक आपल्या देशात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि  त्यांच्या परिवारातील संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात. भाजपाच्या जे मनात आहे, तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या विचारांचे, असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे आहे, तसेच विवेक देबरॉय व रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या झाल्या नाहीत. काही भागात दुबार पेरणी करावी लागली, पण पीक उगवले नाही. शेतीला  लागणारी वीज 12 तास देण्याची घोषणा केली, पण 8 तासही वीज मिळत नाही. धानाला बोनस दिलेला नाही, कांद्याचे अनुदान मिळालेले नाही, कापूस घरातच पडून आहे. अतिवृष्टीची नुकसानभरपाईही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. 36 जिल्ह्यांना 19 पालकमंत्री अशी अवस्था असल्याने प्रशासन ठप्प आहे. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यपाल यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, EWS उमेदवारांबद्दलही करणार पाठपुरावा

राहुल गांधींच्या आडनावापेक्षा महागाईवर बोला

राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करते. पण त्यांची प्रतिमा आणखीनच उजळून निघाली आहे. राहुल गांधी यांच्या आडनावावरून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न याआधीही केला गेला आहे. जे लोक राहुल गांधींच्या आडनावाचा मुद्दा उपस्थित करतात, त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे. महागाई, बेरोजगारी या विषयावर बोलावे, असे पटोले यांनी सुनावले. ‘ना खाऊंगा, ना खाने दूँगा’, म्हणणारे नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार बोकाळला आहे. नोटबंदी हा मोठा घोटाळा आहे. द्वारका एक्स्प्रेस वे महामार्ग बांधकामासाठी एक किलोमीटरला 18 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना त्यावर 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यावरून देशभरातील रस्त्यांच्या कामात किती कोटींचा घोटाळा झाला असेल याचा विचार करा, असेही नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -