घरक्राइमएनआयएने उधळला बॉम्बस्फोटा चा कट; एकास अटक

एनआयएने उधळला बॉम्बस्फोटा चा कट; एकास अटक

Subscribe

मागील काहि महिन्यांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे राज्यभर धाडसत्र सुरू आहे. याच धाडसत्रातून एनआयएने पुण्यातील इसिस मॉड्यूल उघडकीस आणले होते.

मुंबई : मागील काहि महिन्यांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे राज्यभर धाडसत्र सुरू आहे. याच धाडसत्रातून एनआयएने पुण्यातील इसिस मॉड्यूल उघडकीस आणले होते. आतापर्यंत एनआयएने काही दहशतवाद्याना अटक केली असून, आज पुन्हा याच पुणे इसिस मॉड्यूलमधील एकास ठाण्यातून अटक केली आहे. तेव्हा बॉम्बस्फोट घडवून जातीय सलोखा बिघडविण्याचा कट एनआयएने उधळून लावला आहे.(Bomb blast plot foiled by NIA; Arrest one)

इसिस दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवून जातीय सलोखा बिघडविण्याचा कट रचला होता. मात्र राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शमिल साकिब नाचन याच्या ठाण्यातील घरी गुरुवारी टाकलेल्या छाप्यात आणखी एकास अटक केली आहे.

- Advertisement -

साहित्याची तपासणी सुरू

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी इसिस संघटनेच्या स्लीपर सेलचा सदस्य शमिलच्या ठाण्यातील पडघा येथील घरावर छापा टाकला. घरझडतीत अनेक मोबाइल फोन, हार्ड डिस्क आणि काही हस्तलिखित कागदपत्रे मिळाली. त्याची तपासणी आणि विश्लेषण केले जात आहे. शमिलला यापूर्वी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी केल्याप्रकरणी अटक केली होती.

हेही वाचा : मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, EWS उमेदवारांबद्दलही करणार पाठपुरावा

- Advertisement -

या दहशतवाद्यांसोबत करत होता काम

एनआयएने अटक केलेल्या शमिल साकिब नाचन एनआयएने आधी अटक केलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला, महम्मद इम्रान खान, महम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादीर पठाण या पाच आरोपींसह काही अन्य संशयितांसोबत काम करत होता.

हेही वाचा : MVA मधील दुसरा पक्षही मराठवाड्यात सक्रिय; उद्धव ठाकरेंची महिना अखेरीस हिंगोलीत सभा 

दहशतवाद्यांची खुळ मोठी साखळी

सुफा या दहशतवादी संघटनेचे सदस्य इम्रान खान आणि युनूस साकी या दोघांना पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. एनआयएने मोस्ट वाँटेड घोषित केलेल्या या दोघांवर एप्रिलमध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. शमिल आणि इसिस स्लीपर सेलच्या इतर सदस्यांनी पुण्यातील कोंढवा येथील एका घरात बॉम्ब बनविण्याचे साहित्य एकत्र केले होते. त्यांनी गेल्या वर्षी बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेतला होता. तसेच, त्यांनी बनवलेल्या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी जंगलात नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता त्यांच्या या षडयंत्राआधीच एनआयएने त्यांचा कट उधळून लावला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -