घरमुंबईकाँगेसच्या जयघोषात नाना पटोलेंचं स्वागत; शुभेच्छांच्या वर्षावात दुमदुमला परिसर

काँगेसच्या जयघोषात नाना पटोलेंचं स्वागत; शुभेच्छांच्या वर्षावात दुमदुमला परिसर

Subscribe

राज्यात काँग्रेसला अव्वल स्थान मिळवून देणार

काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागलेल्या नाना पटोले यांच्या दिल्लीवारीनंतर आता नागपूरात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी काँगेसच्या कार्यकर्त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य काँगेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदाची माळ काँगेसच्या पक्षश्रेष्ठींकडून अखेर विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात बांधली. नाना पटोले राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळं त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलय.

राज्यात काँग्रेसला अव्वल स्थान मिळवून देणार, अशी ग्वाही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिलीय. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसच्या शेकडो समर्थकांना पटोले यांच्या खांद्याल खांदा लावून काम करण्यासाठी नवी उभारी मिळाली आहे. दरम्यान, नागपूर विमानमतळावर पटोले यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. पटोले यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. दरम्यान, नागपूर विमानतळावर पटोले यांच्या आगमनाने तेथील संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता.

- Advertisement -

काँगेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आज बुधवारी नागपूरात आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर,भंडारा,गोंदियासह विदर्भातून शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.यानिमित्ताने काँग्रेसतर्फे शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. स्वागतसमारंभ जल्लोषात साजरा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी बैठका घेतल्या होत्या. या स्वागत समारंभासाठी भव्यदिव्य मंचही उभारण्यात आला होता. समारंभात कार्यकर्त्यांनी पटोले यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -