घरमुंबईकाँग्रेसचे निवडणुकीसाठी ‘युवा’ कार्ड

काँग्रेसचे निवडणुकीसाठी ‘युवा’ कार्ड

Subscribe

महापरीक्षा पोर्टल रद्द करणार

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कारावा लागलेल्या काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली जय्यत तयारी सुरु केली आहे. यासाठी काँग्रेसने आपले लक्ष नवमतदार आणि युवा मतदारांवर केंद्रीत केले आहे. या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे यासाठी काँग्रेसने यंदा महाराष्ट्र युवक काँग्रेसच्यावतीने युवकांचा विशेष जाहिरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात येत्या काळात काँग्रेसकडून सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार बेरोजगार भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. या विजयासाठी राज्यातील नवमतदार आणि युवक मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे ही जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून राज्यभरातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर सोशल नेटवर्किंग साईटवरही विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून आता महाराष्ट्रील युवकांना आकर्षित करण्यासाठी युवक काँग्रेसने राज्यातील युवकांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी विशेष जाहिरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या जाहिरनामाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

महापोर्टल रद्द करण्याचे आश्वासन

युवकांच्या जाहिरनाम्यात बेरोजगारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या जाहिरनाम्यानुसार जर येत्या काळात महाआघाडीचे सरकार आल्यास महापरीक्षा हे पोर्टल रद्द करण्याची घोषणा करण्यास येणार आहे. त्याबरोबरच राज्य सरकारच्या १ लाख ९१ हजार रिक्त असलेल्या जागा १०० दिवसांच्या आत भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार्‍या उमेदवारांकडून परीक्षा फी माफ करण्यात येणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठीही अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -