घरमुंबईमुंबई पोलिसांत कंत्राटी पद्धतीने भरती? गृहखात्याने दिले स्पष्टीकरण

मुंबई पोलिसांत कंत्राटी पद्धतीने भरती? गृहखात्याने दिले स्पष्टीकरण

Subscribe

विधान परिषदेत मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती प्रक्रियेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप हे संतप्त झालेले पाहायला मिळाले. पण अशा प्रकारची कोणतीही भरती होणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

Mumbai Police Recruitment : मुंबई पोलीस दलात लवकरच कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली. याबाबतचा निर्णय गृह विभागाकडून घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत होते. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. मुंबई पोलीस दलात पुरेशी पोलिसांची यंत्रणा नसल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ज्यानंतर पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेत या कंत्राटी भरती प्रक्रियेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप हे संतप्त झालेले पाहायला मिळाले. पण अशा प्रकारची कोणतीही भरती होणार नसल्याची माहिती गृह खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे, असे एबीपी माझा आणि टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिन्यांकडून प्रसारित करण्यात आले बातमीत सांगण्यात आले आहे. (Contractual Recruitment in Mumbai Police? Explanation given by Home Office)

हेही वाचा – “यामुळे मुंबईचे वाटोळे…” कंत्राटी पोलीस भरतीवरून विरोधक आक्रमक

- Advertisement -

विधिमंडळात आणि सर्वसामान्यांमध्येही पोलीस दलातील कंत्राटी भरतीच्या मुद्यावर नाराजी दिसून आली होती. याबाबत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पोलीस दलातील कंत्राटी भरतीबाबतचे वृत्त धादांत खोटे आहे. पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.

गेल्या काळापासून राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली आहे. मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मागील पोलीस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलिसांना जिल्हा बदल्यांसाठी सोडले होते. त्यामुळे मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली. राज्यात पोलिसांची 10 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

आज ज्यावेळी कंत्राटी पद्धतीने मुंबई पोलीस दलात भरती करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी 289 मांडली. त्यावेळी त्यांच्याकडून गृहखात्याचा या निर्णयाचा विरोध करण्यात आला. कंत्राटी पोलीस हा शब्द कसा वाटतो?, स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा लौकिक आहे. पण हा काळ सोकावत असल्याने आमचा महाराष्ट्र कुठे नेवून ठेवला आबहे, असा प्रश्न देखील भाई जगताप यांनी सभागृहात उपस्थित केला. तर पोलीस हे अत्यंत संवेदनशील असतात, त्यामुळे ते सरकारच्या अंतर्गतच असले पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने कोणतीही खासगी संस्था पोलीस भरतीसाठी नेमण्यात येऊ नये. उद्या जर का कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि या पोलिसांनी सरकारचा आदेश मानला नाही तर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगत दानवे यांनी गृहखात्याच्या या निर्णयाचा विरोध केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -