घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'किकवी धरणाला मान्यता कधी देणार?'; आ. ढिकलेंचा थेट विधानसभेत सवाल

‘किकवी धरणाला मान्यता कधी देणार?’; आ. ढिकलेंचा थेट विधानसभेत सवाल

Subscribe

नाशिक : शहराची लोकसंख्या वीस लाखांपुढे गेली असून अस्तित्वातील धरणसाठयांची साठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे नाशिक शहराचा भविष्यातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी किकवी धरणाला मान्यता देण्याची मागणी नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत मांडली. यावेळी ढिकले नाशिकच्या पाणीप्रश्नी चांगलेच आक्रमक झाले.

शहराच्या पाणीप्रश्नावर अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत मुददा उपस्थित केला. सन 2010 साली तत्कालीन सरकारने त्रंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील प्रस्तावित किकवी धरणाला मान्यता दिलेली आहे. परंतू अजूनही या कामाला मुर्त स्वरूप आलेले नाही. नाशिक जिल्हयाला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचल्याने धरणांची साठवण क्षमताही कमी झाली आहे अशातच वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

- Advertisement -

२०२७ मधे नाशिकमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभुमीवर लाखो भाविक नाशिकमध्ये येत असतात. त्यामुळे कुंभमेळयाच्या पार्श्वभुमीवर पाण्याचे नियोजन करणेही गरजेचे आहे. किकवी प्रकल्पामुळे नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे किकवी नदीवर २.४ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी जवळपास ९१२ हेक्टर जमीनीची पाहणी करण्यात आली असून यामध्ये १७२.४७ इतकी जमीन वनखात्याच्या अधिपत्याखाली आहे. या प्रकल्पाना चालना देण्यासाठी राज्य शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी आ. अ‍ॅड. ढिकले यांनी यावेळी केली.

पेठरोडसाठी विशेष निधी द्यावा

नाशिक पूर्व मतदारसंघातील गुजरातकडे जाणारा पेठरोडवर ७ किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने या रस्तयावर तात्पुरती डागडुजी करण्यात आली मात्र या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून नागरिकांनी याप्रश्नी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ८० कोटींचा निधी हवा आहे या निधीची तरतूद शासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या केल्या मागण्या …

  • पुण्याच्या धर्तीवर रिंगरोडसाठी निधीची तरतूद
  • पेठरोडसाठी विशेष निधी द्यावा.
  • शहरातील रस्त्यांसाठी निधी द्यावा.
  • महापालिकेचा आकृतीबंध मंजूर करावा.
  • दारणा धरणातून पाईपलाईन करावी.
  • मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यासाठी ५४५ कोटी रूपये द्यावे.
  • सिंहस्थ कुंभमेळयाचे नियोजन करावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -