घरमुंबई२०१४ मध्ये झालेल्या अपघाताचे हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर

२०१४ मध्ये झालेल्या अपघाताचे हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर

Subscribe

पैशाच्या देवाण घेवाणातून तसेच निवडणूकीच्या वादातून २०१४ मध्ये झालेल्या अपघाताचे हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२०१४ मध्ये वडाळा येथे झालेल्या अपघाताचे खुनाच्या गुन्ह्यात रूपांतर झाले असून या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने टँकर चालकाला अटक केली आहे. या हत्येसाठी ४० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती, अशी धक्क्कादायक माहिती तपासत समोर आली आहे. ही हत्या पैशाच्या देवाण घेवाणातून तसेच निवडणूकीच्या वादातून करण्यात आली होती.

असा झाला अपघात

इकबाल बरकत खान (४०) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव होते. इकबाल खान हा अँटॉप हिल येथील कोकरी आगार येथे राहण्यास होते. १४ जानेवारी २०१४ मध्ये रात्रीच्या सुमारास इकबाल हे सायकलवरून जात असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून वाहनाचा शोध घेतला मात्र वाहन मिळून न आल्यामुळे २०१६ मध्ये वडाळा टीटी पोलिसांनी २०१६ मध्ये हा गुन्हयाचे ‘अ’ वर्गीकरण केला होता.

- Advertisement -

दरम्यान गुन्हा अन्वेषण विभाग कक्ष क्रमांक ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या पथकातील पोलीस अमलदाराला एका खबऱ्याने इकबाल खान याचा अपघात केला असता संशयित म्हणून अमोल पासोबा (३३) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असझाला नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने कक्ष ३ च्या पथकाने तपास सुरु ता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अपघाताचे हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर

अमोल पासोबा हा माहीम येथे राहणारा सैजुद्दीन हारून कुरेशी याच्या पाण्याचा टँकरवर चालक म्हणून काम करीत होता. जानेवारी २०१४ मध्ये वकील नावाचा व्यक्तीने सैजुद्दीन याला इकबाल खान याला अपघातात ठार करायचे असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तो ४० हजार देईल असे सांगितले होते. अमोल पासोबाला त्यावेळी पैशाची गरज असल्यामुळे सैजुद्दीनने या कामासाठी त्याला तयार केले होते. इकबाल खान याचा पावाचा व्यवसाय होता. तो सायकवरूनच पाव, बटर खारीची डिलेव्हरी करीत होता. वकील आणि इकबाल एकाच गावाचे असल्यामुळे या व्यवसायात दोघांची भागीदारी होती. दरम्यान इकबालने वकिलाला १० लाख रुपये उधारीवर दिले होते, त्यातून दोघांचा वाद होता तर वकील हा गावी ग्रामपंचायत निवडणुकीत हरला होता त्याचा दोष त्याने इकबालला दिला होता.

- Advertisement -

निवडणुक हरल्यामुळे काढला काटा

इकबालने विरोधकांना मदत केल्यामुळे मी निडणुकीत हरलो, असा वकीलचा इकबालवर आरोप होता. या दोन्ही वादातून वकिलाने इकबालचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्याच्या हत्येची सुपारी सैजुद्दीनला दिली होती. सैजुद्दीनने चालक अमोल याला यासाठी तयार करून १४ जानेवारी रोजी रात्री इकबाल हा सायकलवर घरी जाण्यासाठी निघाला असता वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमोलने इकबालंच्या सायकलला धडक देऊन टँकर त्याच्या अंगावर घातला होता. त्यात इकबालचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडाळा टीटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून अज्ञात वाहनाचा शोध घेतला. मात्र तो मिळून न आल्यामुळे गुन्हयाचा तपास थांबला होता, अशी माहिती कक्ष ३ प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंभे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी अमोल पासोबा याला या गुन्हयात अटक केली असून वकीलच शोध घेण्यात येत असून सैजुद्दीन हा माहीम पोलिसांच्या एका गुन्ह्यात तुरुंगात असून त्याचा ताबा घेण्यात येणार असल्याचे निकुंबे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास कक्ष ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंभे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि . राजू बागल, नवनाथ उघडे, गजाजन भारती, महेंद्र कांबळे, अविनाश वळवी, गावित, पोलीस हवालदार अशोक राणे, जाधव आणि पथक यांनी केला आहे.


वाचा – पायाच्या दोन बोटातील अंतरावरून सापडला खूनी 

वाचा – बदनामीच्या भितीमुळे केला तृतीयपंथीय प्रेयसीचा खून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -