घरमुंबईकरोना व्हायरस - उपचार घेणाऱ्या मुंबईतील तिघांना डिस्चार्ज

करोना व्हायरस – उपचार घेणाऱ्या मुंबईतील तिघांना डिस्चार्ज

Subscribe

करोना व्हायरस - केरळातील एक रुग्ण पॉझिटीव्ह, मुंबईतील तिघांना डिस्चार्ज

सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालणारा करोना व्हायरस आता भारतात पोहोचला असून भारताच्या केरळमध्ये पहिला करोनाचा रुग्ण आढळला आहे. हा तरुण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची भारतात परतल्यानंतर तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले असून सध्या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या सहा पैकी तीन जणांचे दुसऱ्यांदा पाठवलेले नमुना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सध्या राज्यात नऊ जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यातील सध्या तीन मुंबईत, पुण्यात पाच तर, नांदेड येथे एक जण दाखल आहे. आतापर्यंत मुंबई विमानतळावर ४ हजार ८४६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. बुधवारपर्यंत १० जण दाखल होते. त्यामध्ये गुरुवारी दोघांची वाढ झाली. पण, मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सर्दी आणि तापाची लक्षणे असलेल्या सहा जणांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यापैकी तीन जणांचे दुसऱ्यांदा पाठवलेले नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील किमान तीन आठवडे (२८ दिवस पूर्ण होईपर्यंत) त्यांची दूरध्वनीद्वारे दररोज विचारपूस केली जाणार आहे. हे तीनही जण मुंबईचे असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

- Advertisement -

बुधवारपर्यंत आरोग्य विभागामार्फत पुण्याच्या एनआयव्हीकडे एकूण १३ नमुने पाठवण्यात आले होते. त्यामध्ये तीन नमुने हे दुसऱ्या वेळेसच्या चाचणीचे होते. १३ पैकी नऊ नमुनांचा अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे. उर्वरित चार नमुन्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. १८ जानेवारीपासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ४ हजार ८४६ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -