घरमुंबईमलबार हिलसह ७ कोरोना बाधित क्षेत्र मुक्त; १२ रुग्ण बरे होऊन घरी...

मलबार हिलसह ७ कोरोना बाधित क्षेत्र मुक्त; १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

Subscribe

मलबार हिल येथील ज्या भागांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते ते बाधित क्षेत्र आता खुले करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या ग्रँटरोड, मलबार हिल, वाळकेश्वर या डि विभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी या भागातील ७ बाधित क्षेत्र आता खुले करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आतापर्यंत १२ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी एकप्रकारे आशेचा किरण असून सर्वांनाच समाधान देणारी ही घटना आहे.

रूग्णांची संख्या दीडशेच्या उंबरठ्यावर

महापालिकेच्या डि विभागांमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १४१ एवढी झाली आहे. या विभागातील कोरोना ग्रस्तांची संख्या दीडशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. परंतु यामध्ये भाटीया रुग्णालय आणि जसलोक रुग्णालयातील रुग्णांचाही समावेश केल्यामुळे येथील रुग्णांचा आकडा वाढलेला आहे.

- Advertisement -

एकूण १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

परंतु मलबार हिल येथील ज्या भागांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते ते बाधित क्षेत्र आता खुले करण्यात आले आहे. या भागात एकूण ९ रुग्ण आढळून होते. यापैकी २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उर्वरीत सात रूग्णांसह येथील अन्य रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत एकूण १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती डि विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.


बाळासह गावी आलेल्या आईला प्रवेश नाकारला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -