घरमुंबईलोकलमध्ये आधुनिक पेहरावावरून महिला पत्रकाराला धमकी!

लोकलमध्ये आधुनिक पेहरावावरून महिला पत्रकाराला धमकी!

Subscribe

एका महिला पत्रकाराला धावत्या लोकलमध्ये एका मुस्लिम महिलांनी तिच्या जीन्स आणि टॉप या आधुनिक पेहरावावरून टोमणे तर मारलेच मात्र धमकीसुद्धा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला पत्रकारने या संबंधित फेसबुक पोस्ट टाकून घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून, अशा विकृत मानसिकता असलेल्या महिलांचा विरोध केला आहे.

viral post
व्हायरल पोस्ट

काय आहे प्रकरण 

या महिला पत्रकारांचे नाव सुमन पाल आहे. आज, गुरुवारी सकाळी कार्यालयात जाण्यसाठी वडाळा रेल्वे स्थानकावरून १०.१५ ची गोरेगाव लोकल तिने पकडली. सुमनही रेल्वेच्या (मिडल) महिलांच्या डब्यामधून प्रवास करत होती. लोकलमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्या लोकलमध्ये उभ्या होत्या. सुमन पाल जीन्स आणि फॉर्मल टॉप परिधान केला होता. सोबतच सुमनचे केस मोकळे होते. मात्र तिच्या शेजारी असलेल्या मुस्लिम महिलांनी सुमनला चक्क केस बांधण्यास सांगितले. त्यावर ती म्हणाली की, ‘माझ्या केसांमुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? माझी मर्जी, त्यावर ती म्हणाली (हमारे मुस्लिम धर्म में ऐसा नहीं चलता, वैसे भी इस तरह के कपडे….पहनती है, तू पेशा करती है क्या?), या व्यतिरिक्त घाणेरड्या पद्धतीने ती बोलली. त्यावर सुमन यांनी जाब विचारला. तिला सांगितले की, तुमचे विचार घाणेरडे आहेत. त्यावर त्या महिलांनी धमकावत म्हटले की, तू वांद्रे उतर तुला दाखवतो. हे प्रकरण एवढं वाढलं की सुमनला सहप्रवाशांनी त्यांच्याशी वाद न घालण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सुमन पालही वांद्रे स्थानकात उतरल्या नाही. मात्र अंधेरी कार्यालयात गेल्यावर लोकलमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत तिने फेसबुक पोस्ट टाकून, अशा मानसिकतेचा विरोध केला आहे.

- Advertisement -

घटनेवर सुमन पाल यांची प्रतिक्रिया, 

दरम्यान, सुमन पाल यांनी ‘दैनिक आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, अशा मानसिकतेवर आळा घालणे आवश्यक आहे. कारण मुंबई शहरात कॉर्पोटेत क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि तरुणीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कार्यलयात जात असताना जीन्स आणि फॉर्मल टॉप परिधान करून जाणाऱ्या महिलांना अशी मानसिकता असलेल्या महिलांच्या विरोधाला समोर जावे लागत आहे. त्यामुळे आता प्रवासादरम्यान, आधुनिक पेहराव करणेसुद्धा महिलांना भितीदायक वाटत आहे.

हेही वाचा –

सुनील तटकरे यांना धक्का, पुतणे अवधूत तटकरेंच्या हाती शिवबंधन?

- Advertisement -

नारायण राणे भाजपत आले, तर भाजप पदाधिकारी शिवसेनेत जाणार!

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -