घरमुंबईCorona Update : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन दोन्ही लसी परिणामकारक; आयुक्तांनी केले स्पष्ट 

Corona Update : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन दोन्ही लसी परिणामकारक; आयुक्तांनी केले स्पष्ट 

Subscribe

दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

लसीकरण केंद्रावर पहिल्या टप्प्यात कोरोनावरील प्रतिबंधक लस म्हणून १६ जानेवारीपासून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची ‘कोविशिल्ड’ लस देण्यात आली. तर १५ मार्च २०२१ पासून भारत बायोटेक या कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ ही लस देण्यास सुरुवात झाली. या दोन्ही लसींचा परिणाम एकच आहे, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. तसेच नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसून सदर दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून भारत सरकारच्या परवानगीने ‘कोविड-१९’ लसीकरण मोहीम कार्यन्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची ‘कोविशिल्ड’ लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर १५ मार्चपासून भारत बायोटेक कंपनीद्वारे निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ ही लस वापरण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली.

- Advertisement -

आणखीन काही वेगळ्या लसीदेखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सध्या सदर दोन्ही प्रकारच्या लसींचा वापर मुंबईसह देशात करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही लसी परिणामकारक आहेत, असे मुंबई महापालिका आयुक्तांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोना संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांचे किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण-अलगीकरण करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोना विषयक सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -