घरमुंबईCorona Vaccine Mega plan: प्रौढांसाठी रेल्वे स्थानकावरही उपलब्ध होणार लस

Corona Vaccine Mega plan: प्रौढांसाठी रेल्वे स्थानकावरही उपलब्ध होणार लस

Subscribe

यासाठी पालिकेने सुमारे ५६ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे.

देशभरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकराने १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेनेही लसीकरण मोहिम अधिक जलद गतीने व्हावी यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. मुंबईतील अनेक कोरोना लसीकरण केंद्रात सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे, मध्य रेल्वेच्या स्थानकाच्या परिसरात पालीकेतर्फे लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने सुमारे ५६ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील पालिकेच्या लसीकरण केंद्रांची संख्या ३९ वरून १०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

सध्या पालिकेची 39 असून राज्य व केंद्र सरकारची 17 आणि खाजगी 73 एकूण मुंबईत केंद्रांची संख्या 129 पर्यंत पोहचली आहे. दरम्यान १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असल्यामुळे पालिकेनेही नियोजन सुरु केले आहेत. या लसीकरणासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच लसींच्या साठवणुकीसाठी आवश्यक कोल्ड स्टोरेजची व्यवस्था वाढण्यात येणार आहे. स्पुचनिकसह केंद्र सरकार ज्या लस वापरण्यास परवानगी देईल अशा लसींचा वापर सुरु करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीमध्ये पुरेसा लसींचा साठा असून आवश्यक साठा मागवला जात आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -