घरमुंबईविद्यार्थ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण; राज्यात दोन वर्षांत ४० विद्यार्थ्यांचा मृत्यू

विद्यार्थ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण; राज्यात दोन वर्षांत ४० विद्यार्थ्यांचा मृत्यू

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन बऱ्याच तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशावेळी नेमके काय करायचे हे कळत नाही यासाठी 'वोक्हार्ट हॉस्पिटल'मधील डॉक्टरांच्या टीमने डहाणूकर कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले आहे.

गेल्या काही वर्षात महाविद्यालयीन मुलांमध्ये मैदानी खेळ खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अथवा अचानक बेशुद्ध झाल्यामुळे आकस्मित मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आला अथवा आरोग्यविषयक काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी नेमके काय करायचे? अथवा कोणते प्रथोमपचार करावयाचे हे माहीत नसते? त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू होतो. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील ४० महाविद्यालयीन मुलांचा आकस्मित मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.

अचानक आलेल्या मृत्यूवर मात करून त्या व्यक्तीला जीवदान देण्याचे प्रशिक्षण भारतामध्ये प्रत्येक नागरिकांना देणे महत्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील ‘वोक्हार्ट हॉस्पिटल’तर्फे विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या परिसरात सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणामध्ये दीडशेहून अधिक विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

महाविद्यालयातील विद्यार्थी पोहणे, धावणे, क्रीडा, ट्रेकिंग आणि अनेक साहसी असे खेळ खेळत असतात. तसेच युवा महोत्सवापासून धार्मिक उत्सवांपर्यंत विविध महोत्सवात ते सहभागी होत असतात. अशावेळी तातडीची वैद्यकीय मदतीची गरज लागण्याचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे हेच ओळखून मीरा रोड येथील ‘वोक्हार्ट हॉस्पिटल’ने या प्रशिक्षणाचा पुढाकार घेतला होता अशी माहिती हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली आहे.

विद्यार्थी, शिक्षकांना देण्यात आले प्रशिक्षण

वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नर्सिंग आणि डॉक्टरांच्या टीमने डहाणूकर कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षकांना प्रात्यक्षिके आणि संवादात्मक सत्राच्या माध्यमातून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले. पडणे, कापून घेणे किंवा अन्य प्रकारे स्वत:ला दुखापत वा जखम करून घेणाऱ्या अशा तातडीने मदत आवश्यक असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्याच्या प्राथमिक पद्धतींचा, तसेच हार्ट अटॅक येत असलेल्या व्यक्तीला रबरी मानवी पुतळ्याच्या मदतीने सीपीआर देण्याचा समावेश या प्रशिक्षणात होता.

- Advertisement -

हेही वाचा – हृदयविकाराच्या कृत्रिम झटक्याचा प्रयोग; वाचवले महिलेचे प्राण

हेही वाचा – घणसोलीत क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -