घरमुंबईउन्हाळ्यात करा जास्तीत जास्त रक्तदान; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

उन्हाळ्यात करा जास्तीत जास्त रक्तदान; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

Subscribe

उन्हाळ्यात हॉस्पिटल्समधील रक्ताचा तुटवडा भासतो हे सर्वश्रूत आहे. पण, गेल्या २ वर्षांपासून एसबीटीसी म्हणजेच राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे हा हॉस्पिटल्सना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

उन्हाळ्यात हॉस्पिटल्समधील रक्ताचा तुटवडा भासतो हे सर्वश्रूत आहे. पण, गेल्या २ वर्षांपासून एसबीटीसी म्हणजेच राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे हा हॉस्पिटल्सना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी ‘राज्य रक्त संक्रमण परिषद’ने (एसबीटीसी) दोन महिने आधीच हालचाली सुरू करुन मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. गरजेनुसार आवश्यक रक्तदान शिबीरं भरवून रक्ताचा पुरेसा साठा साठवून ठेवा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

एप्रिल – जून दरम्यान रक्ताचा तुटवडा

एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. उन्हाळ्याचे दिवस आले की मुंबईसह राज्यभरात रक्ताचा तुटवडा पाहायला मिळतो. मात्र यंदाच्या वर्षी रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी ‘राज्य रक्त संक्रमण परिषद’ने (एसबीटीसी) दोन महिने आधीच हालचाली सुरू केल्या आहेत. ‘एसबीटीसी’ने मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत रक्तदात्यांना सुट्ट्या असल्याकारणाने लोकं फिरायला जातात. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी असल्याने रक्तदान शिबीरेही भरवली जात नाही. त्यामुळे या तीन महिन्यात रक्ताचा खूप तुटवडा भासतो. यासाठीच उन्हाळ्यात जास्तीत जास्त सामाजिक संस्था, धर्मादाय संस्थांनी रक्तदान शिबीरे आयोजित करुन रुग्णालयांना रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करावी तसंच जिल्हा स्तरावर रक्तदान करणाऱ्यांची बैठक घ्यावी, असं आवाहन ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने केलं आहे.

- Advertisement -

प्रत्येक जिल्हा स्तरावर रक्तदात्यांची समिती स्थापन करण्यात आली. यात इच्छूक रक्तदात्यांचा समावेश आहे. या रक्तदात्यांना सुद्धा गरजेनुसार रक्तदान शिबीरं भरवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
– डॉ. अरुण थोरात, संचालक, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद

रक्तदान शिबीर राबवा

‘एसबीटीसी’ द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, रक्ताचा तुटवडा भासणार नाही, यासाठी जिल्हा स्वैच्छिक रक्तदान समितीने बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितलं की, ‘‘बऱ्याचदा शिबीरं घेतली जातात. पण, उन्हाळ्यात शिबीर घेण्याचं प्रमाण कमी असतं. कारण, उन्हाळ्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने रक्तदाता किंवा विद्यार्थी बाहेरगावी जातात. त्यामुळे, रक्तदान शिबीर भरवली न गेल्याने पालिका आणि सरकारी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. रक्ताची ही निकड भासू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना पत्र पाठवून आवश्यकतेनुसार रक्तदान शिबीर भरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेव्हा गरज असेल म्हणजे येत्या उन्हाळ्यात जास्तीत जास्त रक्तदान शिबीरं घेतली पाहिजेत. त्यामुळे, रक्ताचा तुटवडा भासणार नाही. आपली लोकसंख्या ११ कोटी २३ लाख आहे तर त्याच्या किमान १ टक्का म्हणजेच ११ लाख २३ हजार एवढ्या रक्ताची गरज असते. त्या पेक्षा जास्त ही गरज असू शकते. आपलं वर्षाचं कलेक्शन हे १६ लाख एवढं आहे.’’

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -