घरमुंबईघणसोलीत क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

घणसोलीत क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

नवी मुंबई महापौर चषक क्रिकेट स्पर्धा दहावीला असताना संदीपने गाजवली होती. त्यावेळी त्याने शेतकरी शिक्षण संस्थेचे स्थान आपल्या जादुई गोलंदाजीने निर्माण केले होते.

नवी मुंबईमध्ये एका क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नवी मुंबईच्या घणसोली येथे ही घटना घडली आहे. क्रिकेटपटू संदीप म्हात्रेचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सामन्या दरम्यान गोलदांजी करणाऱ्या संदीपच्या छातीत दुखायला लागले होते. षटक पूर्ण करून सामना अर्धवट सोडून संदिपला घरी नेले. घरी गेले असता संदीपचा मृत्यू झाला आहे.

क्रिकेटचे सामने गाजवले

संदीप हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. शालेय जीवनापासून संदीपने आपले नाव क्रिकेट क्षेत्रात गाजवायला सुरवात केली होती. नवी मुंबई महापौर चषक क्रिकेट स्पर्धा दहावीला असताना संदीपने गाजवली होती. त्यावेळी त्याने शेतकरी शिक्षण संस्थेचे स्थान आपल्या जादुई गोलंदाजीने निर्माण केले होते. गजानन क्रिकेट संघ (म्हात्रे आळी) या संघाच्या अनेक विजयामध्ये संदीपचा सिंहाचा वाटा होता. अनेक स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज म्हणून संदीपचा गौरव करण्यात आला होता. संदीप हा पंचक्रोशीत अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. प्रत्येक संघातील खेळाडूंशी संदीपचे मैत्रीपूर्ण संबंध होते.

- Advertisement -

गोव्याच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (४७ वर्ष) याचा सामन्या दरम्यान मृत्यू झाला. राजेश घोडगे याला सामना सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला. मडगाव क्रिकेट क्लबने सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. नॉन स्ट्राईकवर असताना राजेशला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खाली कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

हेही वाचा – 

- Advertisement -

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं खेळाडूचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -