घरमुंबईक्रॉफर्ड मार्केटमधील फळ विक्रेत्यांचा पालिका मुख्यालयावर हल्लाबोल

क्रॉफर्ड मार्केटमधील फळ विक्रेत्यांचा पालिका मुख्यालयावर हल्लाबोल

Subscribe

व्यापाऱ्यांना अंधारात ठेवून पुनर्विकास होत असल्याचा आरोप

मुंबई महापालिकेने इंग्रजांच्या काळातील क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास करताना तेथील फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांना मार्केटबाहेर छोट्याशा जागेत स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ तेथील व्यापाऱ्यांच्या संघटनेने गुरुवारी पालिका मुख्यालयावर धडक देत हल्लाबोल केला. तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप व माजी नगरसेवक गणेश सानप यांना याबाबतची खबर मिळताच त्यांनी तात्काळ पालिका मुख्यालयात धाव घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांना या प्रकरणात यशस्वी मध्यस्थी करून योग्य तो तोडगा काढण्याची विनंती केली.

मात्र क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासात व्यपाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांना सहाय्यक आयुक्त (बाजार) मृदुला अंडे यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी क्रॉफर्ड मार्केट फळ विक्रेता व्यापारी मित्र मंडळातर्फे अध्यक्ष तानाजी पाटील, संदिप गांजाले ( उप शाखाप्रमुख २०८) यांनी केली आहे.
तर स्थानिक नगरसेविका सुजाता सानप आणि माजी नगरसेवक गणेश सानप यांनी, क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास करताना तेथील व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा, व्यवसायासाठी योग्य प्रकारची जागा देण्यात यावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास करताना तेथील व्यापाऱ्यांना त्यांच्या हक्काची जागा देण्यात यावी. पुनर्विकास होईपर्यंत पर्यायी जागा थोडी मोठी व व्यवस्थित अगदी सुविधायुक्त अशी जागा देण्यात यावी. आम्ही व्यापारी पालिकेला नियमित भाडे देत असूनही आम्हाला विश्वासात न घेता मार्केटचा पुनर्विकास केला जात आहे. पुनर्विकास करताना देण्यात येणारी पर्यायी जागा ही खूपच कमी असून लोखंडी स्टॉल स्वरुपात आहे. ही जागा खूपच कमी असल्याने बांधवांना त्यांचा फळांचा माल नीटपणे ठेवण्यास अडचण येत आहे. तसेच, लोखंडी स्टॉल असल्याने परवाच्या वादळी वारा आणि पावसात या स्टॉलसमोर पाणी साचले होते. लोखंडी स्टॉल असल्याने शॉर्टसर्किट झाल्यास व्यापाऱ्यांचे जीव धोक्यात येतील, अशा तक्रारींचा पाढा फळ विक्रेता मित्र मंडळाचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी वाचला.

मार्केटच्या पुनर्विकासाला व्यापारी बांधवांचा विरोध नाही. मात्र गेले वर्षभर कोरोना महामारीचा फटका बसलेला असताना पालिकेने व्यपाऱ्यांना विश्वासात न घेता मार्केटचा पुनर्विकास करणे चुकीचे आहे. पालिकेने व्यापाऱ्यांना मार्केटच्या पुनर्विकासात नेमकी किती जागा देणार, कधी देणार, तोपर्यंतच व्यापाऱ्यांना पर्यायी जागा नीटपणे व मोठया स्वरूपाची द्यावी. त्या ठिकाणी आवश्यक सेवासुविधा देण्यात यावी, असे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

…तर दारू खरेदीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांची टेस्ट का नाही? कल्याण पूर्वेतील नागरीकांचा प्रशासनाला प्रश्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -