घरमुंबईमुंबईत कसा साजरा झाला दहीहंडी उत्सव? जाणून घ्या एका क्लिकवर!

मुंबईत कसा साजरा झाला दहीहंडी उत्सव? जाणून घ्या एका क्लिकवर!

Subscribe

दहीहंडी म्हटलं की देशभरात उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचं देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. खासकरून मुंबईत मोठ्या उत्साहात दहीहंडीला सुरुवात झाली आहे. दादरमध्ये मानाच्या जिवा देवशी निवास मित्र मंडळाच्या दहीहंडीला साईराम गोविंदा पथकाने सकाळी ९.३०च्या सुमारास पहिली सलामी देऊन मुंबईतल्या दहीहंडी उत्सवाचा श्रीगणेशा केला!



प्रो कबड्डीच्या धर्तीवर ठाण्यात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले होते. अष्टविनायक मंडळाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ ५९ सेकंदात त्यांनी ८ थर लावले आहेत. बालवीर गोविंदा पथकाने १.०८ सेकंदात आठ थर लावत दुसरा क्रमांक मिळवला तर कोकण नगर पथकाने १.०३ सेकंद वेळ घेऊन तृतीय क्रमांक तर शिवसाई गोविंदा पथकाने १.१७ सेकंदात आठ थर लावून स्पर्धेत आपले नाव राखले आहे.

- Advertisement -

 


प्रो कबड्डीच्या धर्तीवर ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून जय जवान आणि माजगाव ताडवाडी हे प्रमुख गोविंदा पथके बाहेर पडले आहेत. जय जवान पथकाचा आठव्या थरावरून मानवी मनोरा कोसळला. पहिल्या वहिल्या प्रो दहीहंडीचा विजेता मान मिळवण्याची संधी जय जवान आणि ताडवाडी यांची हुकली आहे. आता शिवसाई आणि बालमित्र हे दोन पथक प्रो दहीहंडीमध्ये थर लावणार आहेत.

- Advertisement -


मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक भागांमध्ये सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. मात्र, एकीकडे दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचं दिसत आहे. आतापर्यंत दहीहंडीच्या खेळात एकूण ८६ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या गोविंदांपैकी काहींवर उपचार सुरु असून, काही गोविंदांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. या घटनांमुळे पुन्हा एकदा दहीहंडी पथकातील गोविंदाच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यानेही आपल्या मुलासोबत आज दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. मुलगा अब्राम आणि पत्नी गौरीसोबत शाहरुखने दहीहंडी फोडली आहे.

Shahrukh Khan Dahihandi
शाहरुख खान दहीहंडी फोडताना
Abram Khan son of Shahrukh Khan
शाहरुख खानचा मुलगा अबराम दहीहंडी फोडताना

 


एकीकडे मुंबईत सर्वच गोविंदा पथकं थरावर थर चढवून दहीहंडीचा थरार अनुभवत असताना दुसरीकडे मुंबईच्या फुटपाथवर या बाळगोपाळांची एक वेगळी दहीहंडी सुरु होती. चर्नी रोडवरच्या या चिमुकल्यांची ही दहीहंडी कदाचित धांगडधिंगा, सेलिब्रिटींचा नाच, राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शन आणि नियमावलीचा खेळ यापासून वेगळी असेल…पण दहीहंडीमधला खरा आनंद कदाचित त्यांना मिळत असावा…


BREAKING – सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू

सविस्तर वाचा – https://www.mymahanagar.com/mumbai/mumbai-dahi-handi-govinda-died-during-treatment-in-sion-hospital/25685/


ठाण्यात मनसेची मानाची दहीहंडी जय जवान गोविंदा पथकाने फोडली, ९ थर लावून फोडली हंडी, न्यायालयाच्या आदेशांमुळे नाही लावले १० थर


मुंबईत दहीहंडीदरम्यान जखमी गोविंदांची संख्या ६०वर, ४० जणांवर उपचार सुरू तर २० जणांना डिस्चार्ज


घाटकोपरला राम कदम यांच्या दहीहंडीमध्ये शेखर सुमनची उपस्थिती

Actor Shekhar Suman at Ghatkopar Dahi Handi
शेखर सुमन आणि राम कदम यांच्यात या फोटोवेळी काय चर्चा सुरू असेल बरं?

घाटकोपरमध्ये वरूण धवनने धरला ‘टणटणाटण’ गाण्यावर ठेका! आणि पब्लिक धम्माल नाचायला लागलं!


कुर्ला पूर्व येथील मनसेच्या दहीहंडीमध्ये शिवसेना आणि भाजपाचे दहीहंडी मंडळ आपसात भिडले

Sena-BJP Party Workers Tussle in Kurla
कुर्ला पूर्व येथील मनसेच्या दहीहंडीमध्ये शिवसेना आणि भाजपाचे दहीहंडी मंडळ आपसात भिडले

ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जय जवान पथकाने दिली ९ थरांची सलामी. विशेष म्हणजे या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी कॉमेंट्री केली!


स्वामी प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपये केरळ पूरग्रस्तांसाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी २ लाख रुपयांचा धनादेश

CM at Swami Pratishthaan Dahi handi in Thane
स्वामी प्रतिष्ठानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडेने उपस्थिती लावली

Big Boss Marathi Season One Winner Megha Dhade in Dahi Handi
मेघा धाडे आणि सुशांत शेलार
Actress Megha Dhade with Sushant Shelar
अभिनेत्री मेघा धाडे आणि अभिनेता सुशांत शेलार

९ थर लावल्याबद्दल जय जवान गोविंदा पथकाचा ट्रॉफी देऊन सन्मान

Jai Jawan Govinda Pathak with Trophy
९ थर लावल्याबद्दल जय जवान गोविंदा पथकाचा ट्रोफी देऊन सन्मान

ठाण्यात शिवशाही पथकाचे ८ थरांसाठी ३ थरारक प्रयत्न


स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत जय जवान पथकाने लावले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती ९ थर, यंदाच्या दहीहंडीत पहिल्यांदा लावण्यात आले ९ थर


दुपारी २ वाजेपर्यंत जखमी गोविंदांची आकडेवारी

एकूण ३६ जखमी – पैकी १८ गोविंदांवर उपचार सुरु

जेजे – १
केईएम – २ 
नायर – २
अग्रवाल – २
राजावाडी – १
महात्मा फुले – १
व्ही एन देसाई – १
बांद्रा भाभा – ३ 
एस के पाटील – २ 
पोद्दार – २ 

सर्वांची प्रकृती स्थिर


राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीच्या सोहळ्यात शिवम काळे या आठ वर्षांच्या मुलाने आपल्या योग कलांनी गोविंदाची मन जिंकले. बुलढाण्याचा शिवम तीन शाळांमध्ये योग शिकवतो.


भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीला प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान हीने हजेर लावली. 

TV Acrress Sara Khan Dahihandi
टीव्ही अभिनेत्री सारा खान

 


दहीहंडीदरम्यान अभिनेत्री तेजा देवकरच्या दिलखेचक अदा!


शिवसेना भवन इथं युवासेना दहीहंडी उत्सवात नामांकित २३ हून अधिक गोविंदा पथकांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत हजेरी लावली. यात ताडवाडी, ओम साई, लालबागचा राजा गोविंदा पथकांनी हजेरी लावली. यावेळी आयोजक १४ वर्षांखालील मुलांनी दहीहंडी फोडू नये अशा घोषणा करत होते. यात आयोजकांचा पथकांशी वाद होतानाही दिसून आला.


बॉडी बिल्डर दिनेश कांबळी आणि रॉबी सिंग यांनी बोरीवली दहीहंडीमध्ये असं दाखवलं आपलं कसब


अभिनेत्री रश्मी देसाईचा बोरीवली दहीहंडीमध्ये धम्माल डान्स


२.२५ – बोरिवलीत प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसेची हजेरी

Actress Mugdha Godse at Borivali Dahi Handi
बोरीवली दहीहंडीमध्ये मुग्धा गोडसे

२.१५ – दहीहंडीदरम्यान विविध घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची संख्या ९ वर पोहोचली. काहींवर उपचार सुरू, तर काहींना घरी सोडले

वाचा सविस्तर – https://www.mymahanagar.com/mumbai/dahi-handi-utsav-9-govinda-got-injured-in-mumbai/25577/


घाटकोपरमध्ये मातृछाया पथकाकडून तिरंग्यासह दिली सलामी

Govinda Pathak Salutes with Indian Flag
घाटकोपरमध्ये मातृछाया पथकाकडून तिरंग्यासह दिली सलामी

२.०० – ठाण्यात शिवसाई पथकाचा एक गोविंदा जखमी..हाताला गंभीर दुखापत..तिसऱ्या प्रयत्नात 9 थर लावताना थर कोसळून गोविंदा जखमी

Govinda Seriously Injured in Thane
ठाण्यात शिवसाई पथकाचा गोविंदा गंभीर जखमी

१.२० – घाटकोपरमध्ये राज्यसभा खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते सामाजिक समरसतेची हंडी फोडण्यात आली

RPI Chief Ramdas Athavle at Ghatkopar Dahi Handi
रामदास आठवले यांनी घाटकोपरमध्ये फोडली सामाजिक समरसतेची हंडी

बोरीवलीत प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीमध्ये अभिनेत्री प्राची देसाई उपस्थित

TV Actress Prachi Surve at Borivali Dahi Handi
बोरीवलीत प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीमध्ये टीव्ही अभिनेत्री प्राची देसाई उपस्थित

खार दांडा येथील गोविंदा पथकात सराव करताना काल १४ वर्षीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला

जखमी गोविंदाला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्याकडून १ लाख रुपयांची मदत

त्याच्यावर खार येथील होली फॅमिली हाॅस्पिटल मधे आयसीयूत उपचार करण्यात येत आहेत


दादरच्या शिवाजी पार्कजवळ रामनाथ गोविंदा पथकानं लावले ८ थर

Ram Krishna Govinda pathak at shivaji park dadar
दादरच्या शिवाजी पार्कजवळ रामकृष्ण गोविंदा पथकाचे थर

१.१० – दुपारी एकपर्यंत मुंबईत ७ गोविंदा जखमी, उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल

जखमी गोविंदांची नावे

१) रविराज गंगाराम चांदोरकर, वय ३५, कालेलकर गोविंद पथक
२) मनाली सुधीर मेने, वय १८, श्री गणेश गोविंदा पथक
३) जानवी जयवंत पतोडे, वय १४, श्री गणेश गोविंद पथक सोडलं
४) शंकर बाबुराव कागलाराम, वय ६१, न्यू कॅम्प लेबर
५) मयूर नायक
६) अमेय पाटील, वडाळा गोविंदा पथक

७) आकाश माळी, वय १६, व्ही एन देसाई हॉस्पिटल


१२.३० – नयन फाऊंडेशनच्या अंध गोविंदा मुलींनी फोडली आयडियलची दहीहंडी


प्रकाश सुर्वेंच्या बोरीवली येथील दहीहंडीमध्ये अभिनेत्री रविना टंडनची उपस्थिती

Ravina Tondon at Borovali Dahi Handi
प्रकाश सुर्वेंच्या बोरीवली येथील दहीहंडीमध्ये अभिनेत्री रविना टंडनची उपस्थिती


दादर फुलमार्केट इथली मनसे पुरस्कृत दहीहंडी फोडण्याचा दादर इथल्या फाळकेवाडी गोविदा पथकाने ६ थर लावून फोडण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न फसला मात्र न्यालायाच्या आदेशानुसार सेफ्टी रोप लावल्याने सहाव्या थराच्या गोविदा वाचवण्यासाठी मदत झाली

Govinda Lost Control in Dahi Handi
दादर फुलमार्केट इथली मनसे पुरस्कृत दहीहंडी फोडताना गोविंदाचा तोल गेला

मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत बोरिवलीच्या शिवसाई गोविंदा पथकाने साडेआठ थर लावले…गोविंदांची मोठी गर्दी

Thane MNS Dahi Handi
मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत बोरिवलीच्या शिवसाई गोविंदा पथकाने साडेआठ थर लावले…गोविंदांची मोठी गर्दी

शिवसेना शाखा क्रमांक २०९मधील दहीहंडीमध्ये गोविंदांच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. ना हेल्मेट, ना बेल्ट, ना मॅट


१२.१५ – घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्या दहीहंडीची जोरदार तयारी…

MLA Ram Kadam Dahi Handi Ghatkopar
घाटकोपरमधील आमदार राम कदम यांची दहीहंडी

 


‘नकळत सारे घडले’ची टीम उतरली दहीहंडी उत्सवात


विक्रोळीत महिला गोविंदांनीही दहीहंडीसाठी लावले थर

Vikhroli Mahila Govinda Pathak
विक्रोळी महिला गोविंदा पथक थर लावताना

११.५० – जांबोरी मैदानात गोविंदा पथकांमधला उत्साह हळूहळू वाढू लागला


११.४० – विरोधकांनी फोडली सरकारच्या विरोधातली हंडी, जनसंपर्क यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात कऱ्हाड मध्ये मोदी आणि फसवणीस सरकारच्या पापाची हंडी फोडून काँग्रेसने केली.. 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार अशी घोषणा काँग्रेसने केली.

Opposition Slams Ruling BJP on Dahi Handi
विरोधकांनी फोडली प्रतिकात्मक दहीहंडी

दादरच्या शिवाजी पार्कच्या गणपती मंदिरात दहीहंडीनिमित्त मराठी सेलिब्रिटिंनी केली पूजा


११.३० – दादरमधली मानाची जिवा देवशी निवास दहीहंडी कोकण नगर गोविंदा पथकाने फोडली


दादरमधल्या पहिल्या सलामीची हा खास दृश्य!


Sunil Shinde Dahihandi
जांभोरी मैदान

११.०० – जांभोरी मैदानात पहिल्यांदाच सुनील शिंदे यांची हंडी, वरळी विधानसभेचे आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केला कमी आवाजात आणि उत्साहात दहीहंजी सादरी करण्याचा निर्धार


Dahihandi at Dadar
दादरमध्ये ८ थरांची सलामी

९.३० – साईराम गोविंदा पथकाने दिली ८ थरांची पहिली सलामी, दादरच्या मानाच्या जिवा देवशी निवास मंडळाच्या हंडीला दिली सलामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -