घरमुंबईमुंबईत निघणार 'संविधान जागर यात्रा'

मुंबईत निघणार ‘संविधान जागर यात्रा’

Subscribe

२५ नोव्हेंबरला देवनार ते चैत्यभूमी-दादर अशी ही  ‘संविधान जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे.

संविधानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या दलित-आदिवासी-कष्टकऱ्यांच्या तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना एकत्र येऊन, संविधान दिनाच्या आदल्या दिवशी अर्थात रविवारी २५ नोव्हेंबरला ‘संविधान जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे. मुंबईत देवनार ते चैत्यभूमी-दादर अशी ही  ‘संविधान जागर यात्रा’ काढली जाईल. देवनार (पांजरापोळ) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दु. १२ वा. यात्रेला सुरुवात होईल.  सुमन नगर – राणी लक्ष्मीबाई पार्क – खोदादाद सर्कल – सेना भवन – शिवाजी पार्क या मार्गे जाऊन चैत्यभूमी-दादर येथे सायं. ५ वाजता या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेचे उद्घाटन नामवंत मानवी अधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या हस्ते होणार आहे. सांगता सभेला लोकशाहीवादी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी यात्रेला हजारोंच्या संख्येत लोकांनी यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यात्रेच्या आयजोकांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आज या उन्मादी राष्ट्रवाद्यांच्या विरोधात आणि त्यांना आधार-आश्रय देणाऱ्या, लोकशाही अवकाश आकुंचित करणाऱ्या, असह्य विषमता वाढवणाऱ्या कार्पोरेट धार्जिण्या आर्थिक धोरणाच्या बुलडोझरखाली सामान्य जनतेला चिरडणाऱ्या, शिक्षणसंस्था व अभ्यासक्रम ताब्यात घेऊन इतिहास बदलू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात संविधानवादी जनता जागोजाग संघर्ष करते आहे. या संघर्षाचा एक भाग म्हणून ही संविधान जागर यात्रा काढण्यात येत आहे.’

- Advertisement -

वाचा: आमच्या मोर्चाचा राज ठाकरेंशी संबंध नाही – फेरीवाले

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -