घरमुंबईमुंबईकरांचे फुफ्फुस कोंडतंय; पीएम २.५ प्रदूषकांचा श्वसननलिकेत शिरकाव

मुंबईकरांचे फुफ्फुस कोंडतंय; पीएम २.५ प्रदूषकांचा श्वसननलिकेत शिरकाव

Subscribe

धुळाच्या कणांमुळे मुंबईकरांच्या फुफ्फुसाला त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

प्रचंड उडणारी धूळ, आकाशात प्रदूषणाचे धुरके आणि ढगाळ अशा विचित्र वातावरणाने मुंबईकर गारठले आहे. यामुळे, मुंबईकरांच्या फुफ्फुसावर पीएम २.५ एवढा प्रदूषकांचा मारा होत आहे. त्यातून धाप लागणे, कोरडा खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. वातावरणामुळे श्वसनविकाराचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांवर गेल्याचे इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अॅण्ड लंग्ज डिसीज संस्थेचे माजी वैद्यकीय सल्लागार डॉ. राजेंद्र ननावरे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळी आणि सायंकाळी गारवा तर दुपारच्या वेळी घामाच्या धारा सुरू असल्याने या बदलत्या हवामानाचा परिणाम मुंबईकरांवर होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. तर, मुंबईतील काही ठिकाणांवर पीएम २.५ सारख्या प्रदूषकांची वाढ झाल्याने श्वास घेण्यास कठीण होत आहे. सध्या थंडी स्थिरावण्यास पोषक वातावरण नसल्याचे हवामानतज्ज्ञ सांगतात. तर, दुपारचा पारा चढ राहिला असल्याचेही सध्याच्या तापमान नोंदी सांगत आहेत. अशा बदलत्या वातावरणाशी मिळते जुळते घेताना मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागला आहे.

- Advertisement -

सर्दी, डोकेदुखीने रुग्णांत वाढ

सकाळ – सायंकाळचा गारठा तर दुपारी उष्ण तापमानाने घशातील खवखव वाढली असल्याच्या तक्रारी रुग्ण डॉक्टरांकडे करत आहेत. नेहमी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असला तरी यावेळी मात्र, थंडी सुरू होण्यास डिसेंबर अखेरचा आठवडा उजाडला आहे. त्यामुळे, वातावरण बदलाचे विकार या आठवड्यापासून सुरू झाले असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत. सर्दीने होणारी डोकेदुखी तर तापाच्या कणकणीसोबत अंगदुखी होत असल्याने रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली दिसते.

अटॅक येण्याची शक्यता

वातावरणात सध्या पीएम २.५ चा निर्देशांक वाढल्याने मुंबईकरांना श्वसनासाठी त्रास होत आहे. या पीएम २.५ श्वसनलिकेत गेल्यावर सूज येते आणि श्वसनलिका आकुंचित पावते. याचा परिणाम फुफ्फुसावर होतो. यामुळे सर्दी-खोकलासारखा त्रास उद्भवत आहे. तर, दम्याच्या रुग्णांना पीएम २.५ चे वाढलेले प्रमाण अटॅक आणू शकते. सीओपीडी रुग्णांसाठीही हेच घटक धोकादायक आहेत. सामान्य मुंबईकरांना ही प्रदूषके श्वसननलिकेत गेल्यास विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतो, अशी शक्यता इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अॅण्ड लंग्ज डिसीज संस्थेचे माजी वैद्यकीय सल्लागार डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

धूरक्या वातावरणात फिरत असताना काय कराल?

१) प्रदूषण भागात फिरताना मास्क लावा.
२) थंड वस्तू टाळा
३) चांगल्या आहाराचं सेवन करा.
४) त्रास उद्भवल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.


हेही वाचा – एसटीला सलाम; १४ हजार किलोची रद्दी विकून कॅन्सरग्रस्तांना मदत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -