घरताज्या घडामोडीएसटीला सलाम; १४ हजार किलोची रद्दी विकून कॅन्सरग्रस्तांना मदत

एसटीला सलाम; १४ हजार किलोची रद्दी विकून कॅन्सरग्रस्तांना मदत

Subscribe

सामाजिक जाणीव ठेवून कॅन्सर रूग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या विभागाने २००८ पासून एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागामध्ये येणार्‍या वृत्तपत्रांची रद्दी विक्री करुन येणारी रक्कम थेट कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी दान स्वरूपात देण्याचा अभिनव उपक्रम जनसंपर्क विभागाकडून केला जात आहे. आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त रद्दी विकून २ लाखा पेक्षा जास्त रूपयाची मदत केली आहे. त्यामुळे इतर शासकीय विभागासमोर एसटीचा जनसंपर्क विभागाने एक नवा आदर्श ठेवलेला आहे.

एसटीच्या राज्यभरातील कारभार मुंबई सेंट्रलच्या एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून चालवला जातो. या मुख्यालयात अनेक एसटी महामंडळांचे विभाग आहेत. या विभागापैकी एसटीत जनसंपर्क विभागसुध्दा आहे. याविभागाचे काम वृत्तपत्रात प्रकाशित होणार्‍या एसटी संबंधित बातम्यांची माहिती ठेवने, चुकीची माहिती आल्यास वृत्तपत्राला खुलासा पाठवणे. तसेच प्रसार माध्यमांशी समन्वय आणि उत्तम संपर्क ठेवणे, असे बरेच काम या विभागात केले जाते. या जनसंपर्क विभागात मुंबईसह राज्यभरात प्रकाशित होणार बरेच वृत्तपत्र येतात. त्यामुळे मोठया प्रमाणा रद्दी जमा होते. कार्यालयात जमा होणारी वृत्तपत्राची रद्दी जनकल्याणासाठी उपयोगी व्हावी म्हणून गेल्या ११ वर्षांपासून कॅन्सर आणि एड्सबाधित रुग्णांना मदत करणार्‍या संस्थेला दिली जाते.

- Advertisement -

कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन ही संस्था गेल्या ४८ वर्षांपासून गरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक निधी उभारण्याचे काम करत आहे. या धर्मदाय संस्थेला २००८ पासून एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागामध्ये येणार्‍या वृत्तपत्रांची रद्दी दान म्हणून दिली जात आहे. एसटी महामंडळाकडून वृत्तपत्राच्या रद्दीच्या विक्रीतून आलेली रक्कम मार्च २०२० पर्यंत दरमहा १०० किलो रद्दी बाजारभावानुसार विक्री करून देणगी म्हणून देण्यात येत आहे.

आमच्या कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन या संस्थेला एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागातून रद्दीचा मार्फत आम्हा मदत करत आहे. त्याच प्रमाणे इतरही उपक्रमाला हातभार लावण्यासाठी इतर विभागाने सुध्दा मदत करावी जेनेकरुन कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी मदत होईल. – जेनेबी अलाना,अध्यक्ष, कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन

कशी केली जाते मदत?

जनसंपर्क विभागात दर तिन महिन्यानंतर कार्यालयात जमा झालेली रद्दी विकली जाते. जेव्हाही रद्दी विक्री केली जाते. तेव्हा कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन या संस्थेच्या व्यक्तीना बोलविण्यात येते. त्यांतर रद्दी  विक्रेता आणि जनसंपर्क विभागाचे कर्मचारी प्रत्येक्षपणे रद्दी विक्री करुन आलेली रक्कम संस्थेला दिली जाते. अशी माहिती  कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन या संस्थेने दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

दानशूर व्यक्तीने पुढे यावे

ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून जनजागृती आणि कॅन्सर रुग्णाच्या उपचारासाठी निधी गोळा करण्याचे काम करत आहे.ज्या प्रमाणे एसटी महामंडळातील रद्दीच्या माध्यमातून आम्हा मदत करत आहे. त्यांच प्रमाणे इतर व्यक्ती किंवा संस्था जून्या वस्तू विक्री करुन आम्हा मदत करता येते.तसेच इतरही माध्यमातून जनतेला मदत कराचची असेल तेही करता येते. या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी दानशूर व्यक्तीने पुढे यावे असे आवाहन या संस्थेकडून करण्यात येत आहे.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -