घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या २ आमदारांची नियुक्ती रोखली; शपधविधीनंतर राज्यपालांच्या विरोधात नाराजी वाढली

राष्ट्रवादीच्या २ आमदारांची नियुक्ती रोखली; शपधविधीनंतर राज्यपालांच्या विरोधात नाराजी वाढली

Subscribe

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम आज विधीमंडळ भवनाच्या परिसरात पार पडला. तब्ब्ल एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होत असल्यामुळे महा विकास आघाडीमधील तीनही पक्ष आनंदात होते. विधानभवन परिसरात थाटामाटात शपथविधीचा कार्यक्रम सुरु होता. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि के.सी. पाडवी यांना शपथ घेण्याच्या पद्धतीवरून सुनावल्यामुळे तीनही पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यपालांनी दोन आमदारांच्या नियुक्तीच्या पत्रावर सहीच केली नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते देखील नाराज आहेत.

विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातील असल्यामुळे राष्ट्रवादीने नव्या सदस्यांची घोषणा केली. तसे अधिकृत पत्र देखील राज्यपालांना पाठवले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या पत्रावर सही होऊन दोन्ही आमदारांचा शपथविधी होणे अपेक्षित होते. मात्र राज्यपालांनी पत्रावर सहीच केली नसल्यामुळे या आमदारांना अद्याप विधानपरिषदेत जाता येत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भल्या पहाटे तत्परता दाखवतात, मात्र राज्यपाल नियुक्त सदस्यांना का लटकवले जात आहे? असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे. राज्यपाल नियुक्त जागेसाठी राष्ट्रवादीने आदिती नलावडे आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे.

- Advertisement -
हे वाचा – राष्ट्रवादीकडून आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे विधानपरिषदेवर

 

शपथविधी सोहळ्यादरम्या काय झालं?

महाविकासआघाडीच्या एकूण ३६ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्री होते. यावेळी शपथ घेण्यासाठी काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार के. सी. पाडवी यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी राज्यपालांनी ‘मी’ म्हटल्यानंतर शपथ घ्यायला सुरुवात केली. मात्र, शपथ झाल्यानंतर पुढे लगेच त्यांनी ‘येथे मी निसर्गाला व मानवतावादाला नतमस्तक होतो…’, असं मनोगत व्यक्त केलं. मात्र, यानंतर राज्यपाल चांगलेच भडकले. ही शपथ मी मान्य करणार नाही, असे सांगत राज्यपालांनी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला सांगितली. वर्षा गायकवाड यांना देखील शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं असताना त्यांनी राज्यपालांनी ‘मी’ म्हटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत शपथ घ्यायला सुरुवात केली. यावर राज्यपालांनी ‘आगे-पीछे कुछ मत बोलिये, जो लिखा है, सिर्फ वही पढिये’, असं बजावत त्यांना रितसर शपथ घ्यायला सांगितले.

- Advertisement -

राज्यपाल शपथविधीदरम्यान भडकले – पाहा व्हिडिओ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -