घरमुंबईदामूनगर, हनुमान नगरमुळे कांदिवलीच्या उरात धडकी

दामूनगर, हनुमान नगरमुळे कांदिवलीच्या उरात धडकी

Subscribe

खाटाच मिळत नसल्याने बाधित रुग्णांचा जीव धोक्यात

महापालिकेच्या आर-दक्षिण विभाग अर्थात कांदिवली विभागात आतापर्यंत करोनाचे सुमारे पाचशे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कांदिवली पूर्व, विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ३०० रुग्ण आहेत. येथील दामू नगर आणि हनुमान नगरमध्ये रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. या रुग्णांना इस्पितळात दाखल करणे म्हणजे कांदिवलीकरांसाठी एक अग्निदिव्य ठरू लागले आहे. तसेच या रुग्णांच्या अतिनिकटच्या संपर्कातील सहा ते आठ संशयितांना त्वरीत क्वारंटाईन करणेही अवघड होऊन बसले आहे.

कांदिवली पूर्व, विधानसभेतील दामुनगर व हनुमान नगर या वस्तीत करोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर, तेथील परिसर त्वरीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून पोलीस,एसआरपी तसेच कम्युनिटी लिडर यांच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील काही भागांमध्ये शौचालयांची संख्या अपुरी पडत असल्याने बायो टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथील शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याद्वारे सकाळच्या सत्रात तीन वेळा व दुपारच्या सत्रात तीन वेळा अशाप्रकारे सहा वेळा प्रत्येक शौचालयांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या आर-दक्षिण विभागात अति जोखमीच्या संशयित रुग्णांसाठी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १३०० खाटांची तर लक्षणे नसलेल्या परंत पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ४०० खाटांच्या कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आर-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संजय कुर्‍हाडे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी शताब्दी रुग्णालयात भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात वेगळा काही बदल होवून नागरिकांना तसेच रुग्णांना योग्यप्रकारे उपचार मिळत नाहीत.

माझ्या प्रभाग क्रमांक ३६मध्ये तानाजी नगर, हवाईनगर आदी ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. बाधित रुग्ण आढळून आला तरच सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण केले जाते. अन्यथा नाही. खिचडी वाटपातही मोठा घोळ आहे. कधी निकृष्ठ तर कधी कमी जेवण असते.
-दक्षा पटेल, नगरसेविका,भाजप.

- Advertisement -

माझ्या विभागात प्रत्येक शौचालयांचे सॅनिटाझेशन दिवसांतून एकदा होत असून महापालिका प्रशासन जेवढे शक्य आहे, तेवढे काम करत आहे. आतापर्यंत ४०० लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप तसेच दरदिवशी ३५० जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले जाते
-डॉ.राम बारोट, प्रभाग क्रमांक ४५, नगरसेवक, भाजप.

रस्त्यांवरच झाडू नाही, रस्त्यालगतच्या व वस्त्यांमधील पेटीका नाल्यांची सफाई नाही. पाण्याचीही समस्या. गरोदर पॉझिटिव्ह महिलेला कांदिवलीहून खाट उपलब्ध होत नसल्याने नायरला दाखल करावे लागते. त्यामुळे करोनाबाधित गरोदर महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड शताब्दी रुग्णालयात निर्माण करायला हवा. -सुनिता रामनगिन यादव, नगरसेविका, भाजप.

बाधित रुग्णांना खाट उपलब्ध होत नसली त्यांच्या संपर्कातील लोकांची क्वारंटाईनमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकारी आपले काम चोख बजावत असले तरी रुग्ण खाटाच उपलब्ध नसतील तर कसे उपचार करणार. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजना फटका सध्या कांदिवलीकरांना बसतोय.
– शिवकुमार झा, नगरसेवक, भाजप.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -