घरमुंबईपूरग्रस्तांच्या मदतीला विलंब; नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा

पूरग्रस्तांच्या मदतीला विलंब; नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा

Subscribe

पूरग्रस्तांना तातडीने मदत न पुरविल्यास १३ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

पश्चिमेत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती उद्भवल्याने शासनाकडून मदत पुरविण्यास विलंब होत असल्याने त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे तातडीने मदत न पुरविल्यास १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘ह’ प्रभाग कार्यालयाबाहेर उपोषणास बसण्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना एक निवेदनाद्वारे दिला आहे.

पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ५१ महाराष्ट्र नगर या परिसरात बैठ्या कौलारू घरे मोठ्या प्रमाणात असून २६ जुलै आणि ४ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत ही घरे पाण्याखाली गेल्याने सुमारे एक हजार ते बाराशे कुटुंबियांचे नुकसान झाले आहे. त्यांची भांडी सर्व सामान खराब झाले असून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंगावरील कपड्यानिशी त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था लोकप्रतिनिधी कडून करण्यात आली.

- Advertisement -

पुराच्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याकडे कपडे ही शिल्लक राहिलेले नाहीत त्यामुळे त्यांना तातडीने १० ते १५ हजार रुपयांची शासकीय मदत अथवा अन्न धान्य तातडीने पुरविण्यात यावे याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी जिल्हाधिकार्यलयाने लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -