घरCORONA UPDATEधारावीत घडतोय चमत्कार; रुग्णांची संख्या आठ दिवसांमध्ये चार पटीने कमी

धारावीत घडतोय चमत्कार; रुग्णांची संख्या आठ दिवसांमध्ये चार पटीने कमी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावीमध्ये कोरोनाग्रस्तांचा फुगत चाललेला आकडा आता कमी होताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये दिवसाला ८० ते ९० पर्यंत वाढणाऱ्यांची संख्या आता मागील तीन दिवसांपासून कमी कमी होवू लागली आहे. मागील आठ दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी चार पटीने कमी होत २५ एवढी झाली आहे. त्यामुळे एक प्रकारे बाधित रुग्णांची संख्या वाढून उसळी मारलेली असतानाच ही संख्या कमी झाल्याने हा चमत्कार आहे की धारावी पॅटर्न? याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मागील काही दिवसांपासून धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच शुक्रवारी या विभागात केवळ २५ रुग्ण आढळून आले. तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८०८ वर पोहोचली असून मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. यामध्ये माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पाच कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर कुंचिकुरवे नगर, आझाद नगर, राजीव गांधी नगर, गांधी नगर को. ऑप.सो. शास्त्री नगर, मदिना कंपाऊंड, मुस्लिम नगर, न्यू म्युन्सिपल चाळ, काळा किल्ला, क्रॉस रोड जागृती सोसायटी, ट्रान्झिट कॅम्प, फातिमा चाळ, पीएमजीपी कॉलनी, बालाजी नगर, के.एम. चाळ, धारावी पीसी, धारावी मेन रोड, समाधान सोसायटी, इंदिरा नगर आदी ठिकाणी प्रत्येक एकेक रुग्ण आढळून आला आहे. तर पाच जणांचे मृत्यू झाले आहे. मृत्यू पावलेले रुग्ण हे फॉलोप्स कॉल्सद्वारे महापालिका त्यांच्या संपर्कात होती. त्यामुळे वेगवेगळ्या तारखांना ते मृत्यू पावल्याने त्यांची एकत्र नोंद शुक्रवारी देण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र आतापर्यंत धारावीतून २२२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

दादरमध्ये वाढले रुग्ण, एकाच दिवसात २१ रुग्ण

दादर परिसरात आतापर्यंत कमी रुग्ण आढळून येत असतानाच शुक्रवारी या विभागात सर्वाधिक २१ रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत दादरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५ वर पोहोचला आहे. दिवसभरात किर्तीकर मार्केटमध्ये १५ रुग्ण आढळून आले आहे. तर बालगोविंददास रोड, मंगलमूर्ती सोसायटी, कासारवाडी, आदी ठिकाणीही रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत या भागातून १७ लोकांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

माहिमने पार केली शंभरी

मागील काही दिवसांपासून कासवगतीने रुग्णांची संख्या वाढत असलेल्या माहिममध्ये शुक्रवारी ११ रुग्ण आढळून आले. त्यामुळे माहिममधील एकूण रुग्णांची संख्या १०७ एवढी झाली. तर मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५ एवढी झाली आहे. शुक्रवारी माहिम कॉजवे, अवर लेडी केलकानी, खतिजाबाई बिल्डींग, एव्हरशाईन बिल्डींग, मापला वाडी, गुप्ते मेटरनिटी होम,रहिमबाल बाग, गितांजली नगर, रहेजा हॉस्पिटल, सागर सोसायटी, मोरी रोड आदी ठिकाणी हे बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णांची संख्या शंभरच्या घरात पोहोचलेली असली तरी आतापर्यंत २३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -