घरमनोरंजनदिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

Subscribe

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील इस्पितळात निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आले. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचे संक्रमण झाल्याचे कळले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली.

इस्पितळात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हॅपेटोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागारांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे इस्पितळाच्या प्रशासनाकडून आधी सांगण्यात आले होते. पण निशिकांत यांना झालेल्या आजारावर कोणतेही उपचार नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

- Advertisement -

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा ‘दृष्यम’, इरफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचेही दिग्दर्शन केले होते. डोंबिवली फास्ट या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केले. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपले नशिब आजमावले होते. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केले होते. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -