घरताज्या घडामोडीरेल्वेमध्ये टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्यांची आता खैर नाही

रेल्वेमध्ये टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्यांची आता खैर नाही

Subscribe

थरारक स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची जणू तरुणांमध्ये स्पर्धाच लागली आहे. नूकतेच दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान लोकलच्या दारात स्टंट करताना २० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. सध्या या स्टंटबाजीमुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून या स्टंटबाजाच्या मुसक्या आवळण्यासाठी आरपीएफच्या कारवाईसह विशेष मल्टिमीडिया जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर रेल्वे परिसरात आणि धावत्या रेल्वे गाडयातील स्टंटबाजीचे व्हिडिओ टाकणार्‍यांवर कारवाईचे नियोजन रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रेल्वे परिसरात आणि धावत्या गाड्यात स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करणार्‍यांची आता खैर नाही.

सोशल मीडियावर सध्या स्टंटबाजी करणारे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या टिकटॉक व्हिडिओची क्रेझ आहे. तरुणाईकडून व्हिडिओ बनविण्याचे प्रमाण अधिक आहे. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मात्र, ते बनविताना अनेकजण जीव धोक्यात घालून व्हिडिओ चित्रित करतात, याबाबत कोणताही विचार तरुणाई करताना दिसत नाही. लोकलच्या दारात उभे राहून भरधाव लोकलमधून तसेच रेल्वे ट्रॅकवर उभे राहून रेल्वे जवळून जातानाचे व्हिडिओ बनविले जात आहेत. नूकतेच दिवा आणि मुंब्रा दरम्यान एक तरुणांचा व्हिडिओ बनविताना अपघात झाल्याने जिव गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रेल्वेने सुध्दा यावर आळा बसविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच रेल्वे प्रशासनाकडून संंबंधीत २०२० या वर्षात मल्टिमीडिया जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये रेल्वेच्या उद्घोषनामध्ये सुचना देण्यात येईल. तसेच कॉलेजच्या तरूणामध्ये सुध्दा यासंबंधी जनजागृती करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सावधान रेल्वे पोलिसांचे असणार लक्ष

दररोज उपनगरीय लोकलमधून ७५ लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान तरुणांचे प्रमाण सुध्दा जास्त आहे. मात्र जेव्हापासून सोशल मीडिया आला. तेव्हापासून लोकल प्रवासाचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होऊ लागले आहे. मात्र काही तरुण या लोकल प्रवासात स्टंट करण्याचे व्हिडिओ तयार करतात. सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे त्यांना लाईक आणि कमेंट मिळतात. मात्र आता रेल्वेत स्टंटचे व्हिडिओ व्हायरल केल्यास यावर रेल्वे पोलिसांची नजर असणार आहे.

रेल्वे परिसरात आणि धावत्या लोकलमध्ये धोकादायक स्टंटचे व्हिडिओ तयार करण्याचे प्रकरण समोर येत आहेत. मात्र हे केले जात असताना इतरही प्रवाशांंचा जीव त्यामुळे धोक्यात येत आहे. आम्ही आवाहन करतो की, रेल्वे गाडी आणि परिसरात असे प्रकार करु नयेत. त्यासाठी तरुणांनी रेल्वेला सहकार्य करावे. अन्यथा निर्दशनास आले तर कारवाई करण्यात येईल – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -