घरमहाराष्ट्रजिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 'महाआघाडी' नाही

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ‘महाआघाडी’ नाही

Subscribe

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस स्वबळावर लढणार आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ तालुक्यातील पंचायत समितीच्या ११४ जागांसाठी येत्या ७ जानेवारीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि निलेश सांबरे यांची संघटनांनी आघाडी केली आहे. मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.

बंडखोरी होण्याची भीतीमुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा घेतला निर्णय

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, बहुजन विकास आघाडी मिळून महाआघाडी होईल अशी अपेक्षा होती. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्नही केले होते. पण, महाआघाडीमुळे जागा कमी मिळून बंडखोरी होण्याची भीती लक्षात घेऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, काँग्रेस आणि जनता दलाशी जमले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने माकप आणि निलेश सांबरे यांच्या संघटनेशी आघाडी केली आहे. तर भाजप स्वबळावर लढत असल्याने यावेळी तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.

- Advertisement -

काँग्रेस आणि जनता दलाने मोजक्याच ठिकाणी उमेदवार मैदानात उतरवले

शिवसेनेने जिल्हा परिषदेसाठी ५४ आणि पंचायत समितीसाठी १०८ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. स्वबळावर लढत असलेल्या भाजपने जिल्हा परिषदेसाठी ४६ आणि पंचायत समितीसाठी ९२ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर भाजपच्या सहकार्याने ७ अपक्ष जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मापक यांनी काही अपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेसाठी ५१ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर जिल्ह्यात अस्तित्वासाठी लढत असलेल्या काँग्रेस आणि जनता दलाने मोजक्याच ठिकाणी उमेदवार मैदानात उतरवले आहेत.


हेही वाचा – मंत्रिपद मिळाले असते तर उद्धव ठाकरेंनाच फायदा झाला असता – भास्कर जाधव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -