मे महिनाभर उकाडा सहन केल्यानंतर जून महिन्याची सुरुवात मुंबईकरांसाठी आल्हाददायक ठरली आहे. कारण जूनच्या पहिल्याच आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर अंगाची लाही लाही झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा हाच आनंद लुटण्यासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी होते. जर तुम्हालाही या दिवसांत समुद्र किनारी जाण्याचा मोह होत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पावसाळ्याच्या या ४ महिन्यांमध्ये तुम्हाला ठराविक दिवशी समुद्रावर जाणे टाळायचे आहे.
भरतीच्या दिवशी जाणे टाळा
जून ते सप्टेंबर हे महिने पावसाचे असतात. शाळा-कॉलेजेस जरी सुरु झाले असले तरी वीकेंडला पावसाचा आनंद लुटायला अनेक जण बाहेर पडतात. वरळी सीफेस, वांद्रे बँडस्टॅड, नरीमन पॉईंट अशा ठिकाणी खूप गर्दी असते. तुम्ही असे काही प्लॅन करणार असाल तर थोडं थांबा! कारण भरतीच्या वेळी येणाऱ्या मोठ्या लाटांचा अंदाज आला नाही तर अपघात होऊ शकतात. समुद्रातून येणाऱ्या उंचच उंच लाटा अंगावर घेताना आनंद होतो. पण या लाटांचा जोर इतका असतो की, तुमचा तोल जाऊन तुम्ही पाण्यात बुडू शकता. गेल्या २-४ वर्षांमध्ये लाटांच्या तडाख्यामुळे अनेक जण वाहून गेले आहेत. घटनांचे गांभीर्य लक्षात घेत दक्षता म्हणून महापालिकेने भरतीच्या दिवसांची आणि लाटांच्या उंचीची माहिती देणारे एक पत्रक काढले आहे. या वेळापत्रकानुसार तुम्ही समुद्रावर जाण्याचा बेत आखा. शिवाय या दिवसांमध्ये समुद्रात जाणे टाळा.
कोणत्या दिवशी आहे ‘हायटाईड’?
यंदा सगळ्यात मोठी लाट साधारण ५ मीटरची आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात या मोठ्या उंचीच्या लाटा येणार आहेत.
जून
तारीख | वार | वेळ | लाटांची उंची |
१३ जून | बुधवार | ११.४३ | ४.६८ |
१४ जून | गुरुवार | १२.३ | ४.८५ |
१५ जून | शुक्रवार | १.१८ | ४.९२ |
१६ जून | शनिवार | २.०६ | ४. ९१ |
१७ जून | रविवार | २.५६ | ४.८२ |
जुलै
तारीख वार वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
१२ जुलै गुरुवार ११.२७ वाजता ४.६५
१३ जुलै शुक्रवार १२.१३ वाजता ४.८५
१४ जुलै शनिवार १.०२ वाजता ४.९६
१५ जुलै रविवार १.४९ वाजता ४.९७
१६ जुलै सोमवार २.३७ वाजता ४.८९
१७ जुलै मंगळवार ३.२५ वाजता ४.७०
ऑगस्ट
तारीख वार वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
१० ऑगस्ट शुक्रवार ११.११ वाजता ४.६०
११ ऑगस्ट शनिवार ११.५६ वाजता ४.८२
१२ ऑगस्ट रविवार १२.४१ वाजता ४.९२
१३ ऑगस्ट सोमवार १.२६ वाजता ४.९६
१४ ऑगस्ट मंगळवार २. ०८ वाजता ४.८५
१५ ऑगस्ट बुधवार २.५२ वाजता ४.६२
सप्टेंबर
तारीख वार वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
८ सप्टेंबर शनिवार १०.५६ वाजता ४.५३
९ सप्टेंबर रविवार ११.३६ वाजता ४.७५
१० सप्टेंबर सोमवार १२.१८ वाजता ४.८५
११ सप्टेंबर मंगळवार रात्री १.५६ वाजता ४.६३
दुपारी १२.५८ वाजता ४.८३
१२ सप्टेंबर बुधवार १.२० वाजता ४.६५
१.२६ वाजता ४.६८
१३ सप्टेंबर गुरुवार २.०२ वाजता ४.५३
(सौजन्य- युट्युब)