घरमुंबईडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपी जामिनासाठी हायकोर्टात

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपी जामिनासाठी हायकोर्टात

Subscribe

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. या जामिनावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी त्यांचे वकील प्रयत्न करणार आहेत. डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. हेमा आहुजा या तिघी महिन्याभरापासून भायखळा तुरुंगात आहेत. गेल्या वेळी विशेष सत्र न्यायालयाने या तिघींचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अखेर जामिनासाठी या तिघींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या तिघींच्या वकिलांनी सोमवारी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला असून लवकरात लवकर या जामीन अर्जावर सुनावणी व्हावी यासाठी वकील प्रयत्न करणार आहेत.


हेही वाचा – डॉ. पायल तडवी प्रकरण: तीनही महिला आरोपींना १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी


काय आहे प्रकरण ?

डॉ. पायल तडवी या नायर हॉस्पिटलमध्ये पीजीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. हॉस्पिटलच्याच आवारातील वसतीगृहात त्या राहत होत्या. पण, तिथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरुन डॉ. पायलला त्रास देण्यात सुरूवात केली, अशी तक्रार डॉ. पायल यांच्या आईने केली आहे. याबाबत पायल यांनी हॉस्पिटलचे अधिष्ठाते, वसतीगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्याते यांच्याकडे तक्रार केली होती. पण, तरीही छळ न थांबल्याने त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं असा आरोप नातेवाईकांनी केला. वसतीगृहातील राहत्या घरात गळफास घेऊन डॉ. पायल यांनी आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -