घरमुंबईमुंबई उच्च न्यायालयातील न्यायदालनात माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायदालनात माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

निवृत्त सैनिक तुषार शिंदे यांनी वृद्ध आई वडिलांविरोधात संपत्तीच्या वादातून केस फाईल केली होती

संपत्तीच्या वादातून एका 55 वर्षीय माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयातील एका न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तुषार शिंदे असे या माजी सैनिकांचे नाव असून त्यांनीन भर कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सर्वांना धक्का बसला.
आईसोबत सुरु असलेल्या संपत्तीच्या वादातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. (Man Attempt Suicide in Mumbai High Court).

निवृत्त सैनिक तुषार शिंदे यांनी वृद्ध आई वडिलांविरोधात संपत्तीच्या वादातून केस फाईल केली होती. या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या एकलपीठासमोर सुनावणी सुरू होती. या प्रकरणाचा निकाल आई वडिलांच्या बाजूने लागला. त्यामुळे संपत्ती हातातून गेल्याच्या विचाराने तुषार शिंदे यांनी हे पाऊल उचलेलं. त्यांनी यावेळी न्यायालयाच्या आवारात धार शस्त्राने हाताची नस कापण्याचा प्रयत्नही केला. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधाने वाईट अनर्थ टळला. यावेळी न्यायालयात उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

तुषार शिंदे हे घाटकोपरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे राहतात. मात्र या घटनेमुळे सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले आहे. नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहचताच त्यांना त्यांच्या स्वाधीन केले जाईल. दरम्यान या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात कठोर तपासणी करूनही शिंदे यांना कटर घेऊन उच्च न्यायालय परिसरात कसा प्रवेश देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Maharashtra SSC Result 2022 : राज्याचा दहावीचा निकाल जाहीर, यंदा 96.94 टक्के निकालासह मुलींची बाजी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -