घरमहाराष्ट्रMaharashtra SSC Result 2022 : यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के, कोकण विभाग...

Maharashtra SSC Result 2022 : यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के, कोकण विभाग अव्वल तर नाशिक सर्वात मागे

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यात यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका आहे.

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,84,790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,68,977 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94 आहे.

- Advertisement -

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90 अशी आहे.

msbshse 10th result 2022

- Advertisement -

राज्यातील 22,921 माध्यमिक शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12,210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6,50,779 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 5,70,027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 2,58,027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 42,170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेस राज्यातील नऊ मंडळामधून एकूण 8169 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8029 दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 7579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.40 आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 54,159 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 52,351 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 41,390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 79.06 आहे.

दहावीचा विभागवार निका

१) पुणे 96.96

२) नागपूर 97.00

३) औरंगाबाद 96.33

४) मुंबई 96.94

५) कोल्हापूर 98.50

६) अमरावती 96.81

७) नाशिक 95.90

९) लातूर 97.27

१०) कोकण 99.27

उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन कसे करायचे? 

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर सर्व माहिती अटी / शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क Debit Card/Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागणार आहे.

गुण पडताळणीसाठी सोमवार २० जून २९ जून २०२२ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या  गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

मार्च एप्रिल २०२२ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी १) ई-मेलद्वारे / संकेतस्थळावरुन २) हस्तपोहोच ३) रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे २० जून ते ९ जूलैपर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेच्या प्रिंटसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

असा पाहा निकाल

दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

१) निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

२) त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

३) त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

४) निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -