घरमुंबईइमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

Subscribe

मालाड येथील घटना; हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

बांधकाम इमारतीच्या साईटवर कामगाराच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न ठेवल्याने एका 19 वर्षांच्या तरुणाचा बुधवारी दुपारी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना मालाड परिसरात घडली. याप्रकरणी बांधकाम साईटचा सुपरवायझर आणि कंत्राटदाराविरुद्ध मालाड पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे. लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मालाड येथील लिंक रोडवरील पोडियम क्रमांक पाच, सेनेटरी इमारतीमध्ये टॉवर क्रमांक दोन या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तिथे काही कामगारांना कामासाठी ठेवण्यात आले होते. तिथेच मुन्नाकुमार काशिनाथराय यादव हा 19 वर्षांचा मुलगा त्याचा मोठा भाऊ तारकेश्वर यादव याच्यासोबत कामाला होता. बुधवारी दुपारी अडीच वाजता त्याला इमारतीच्या पाचव्या मजल्यावर साफसफाईचे काम सोपविण्यात आले होते. सफाईचे काम करताना त्याचा तोल गेल्याने तो पाचव्या मजल्यावर पडला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हा प्रकार तिथे उपस्थित काही कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

- Advertisement -

ही माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात या बांधकाम इमारतीमध्ये कामगाराच्या सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे मुन्नाकुमारच्या मृत्यूस कंत्राटदारासह सुपरवायझरच जबाबदार असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तारकेश्वरच्या जबानीवरुन मालाड पोलिसांनी आरोपींविरुद्ध हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -