घरमुंबईफणसपाडा, सूतकपाडा, बोंड्याचा पाडा अंधारात

फणसपाडा, सूतकपाडा, बोंड्याचा पाडा अंधारात

Subscribe

तालुक्यातील ग्रामपंचायत मांगरूळ हद्दीतील फणसपाडा, सूतकपाडा, बोंडयाचा पाडा या पाड्यांवर जाणारी विद्युत वहिनीच्या तारा तुटल्याने आणि ट्रांसफार्मर जळाल्याने येथील नागरिक मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहेत. महाराष्ट्र वीज वितरण मंडळाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र वीज वितरण मंडळाच्या वाडा येथील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते.

28 जून रोजी वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने येथील तीन विद्युत खांब कोसळून विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यातच येथील ट्रान्सफार्मरसुद्धा जळाले होते. त्यानंतर मात्र येथील तीनही पाडे हे पूर्णपणे अंधारात आहेत. या अंधारात अनेक जणांना सर्पदंश झाले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

- Advertisement -

त्यातच दोन महिन्यांपासून विद्युत वाहिनी चालू नसतानादेखील येथील 165 मीटरधारकांना वीज बिल देण्यात आले आहे. याबाबत येथील नागरिकांनी वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी करूनदेखील विद्युत मंडळाच्या कर्मचार्‍यांनी कोणत्याही प्रकारचे लक्ष दिलेले नव्हते. त्यांनंतर वाडा येथे झालेल्या आमसभेत हा मुद्दा गाजल्याने वीज वितरण मंडळाच्या अधिकार्‍यांनी दोन दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही गेले आठ दिवस येथील अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नसल्याने अखेर येथील शेकडो नागरिकांनी वाडा येथील महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.

अखेर या विषयामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी यांनी अधिकार्‍यांशी यशस्वी मध्यस्थी करून दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन वीज वितरण अधिकार्‍यांनी दिल्यानंतर येथील ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -