घरमुंबईकुणी घर देतं का घर...?

कुणी घर देतं का घर…?

Subscribe

महकच्या बेघर रहिवाशांचे आमरण उपोषण

उल्हासनगरातील महक ही इमारत ऑगस्ट १३ तारखेला रिकामी केल्यावर दुसर्‍याच दिवशी कोसळल्याने इमारतीमधील 31 कुटूंब अनपेक्षितपणे बेघर झाली. काळाने घर हिरावून घेतल्याने व पंधरा दिवस उलटून गेल्यावरही पालिकेकडून हालचाली होत नसल्याने शुक्रवारपासून महकच्या रहिवाशांनी घरासाठी आमरण उपोषण सुरु आहे.

इमारत कोसळण्याच्या आदल्या दिवशी दरवाजे जाम झाल्याने महकच्या रहिवाशांनी पालिकेशी फोनवर संपर्क साधला. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी इमारतीत धाव घेतली. त्यावेळी इमारत एका बाजूला कलंडल्याचे आढळले. त्यानंतर रहिवाशांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी 14 तारखेला पत्यांच्या बंगल्या प्रमाणे महक इमारत कोसळली.

- Advertisement -

त्यानंतर 20 तारखेला पार पडलेल्या महासभेच्या दिवशी रहिवाशांनी मुकमोर्चा काढून घर देण्याची मागणी केली. मात्र पालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने शुक्रवारपासून रहिवासी आमरण उपोषणाला बसले आहेत. या संदर्भात पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची आमदार ज्योती कालानी, डॉ.बालाजी किणिकर, महापौर पंचम कालानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्यासोबत नगरविकास सचिव नितिन करीर यांची भेट घेतली आहे. उल्हासनगरातील बेघरांना कल्याण-डोंबिवली, ठाणे येथील ट्रांझिस्ट कॅम्पमध्ये भाडेतत्वावर आश्रय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -