घरताज्या घडामोडीसततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याकडून पोलीस पुत्राची हत्या

सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याकडून पोलीस पुत्राची हत्या

Subscribe

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाची राहत्या घरात पित्यानेच कोयत्याने हत्या केल्याची खळबळजनक घटना पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगरात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी पित्याला अटक केली असून ही हत्या घरगुती कलहातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी दिली.

हरीश गलांडे (४०) असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. हरीश हा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होता. हरीश हा पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगर येथे पत्नी मुले आणि आईवडीलासोबत राहण्यास होता. हरिशला दारूचे भयंकर व्यसन होते, त्यातच काही वर्षांपासून तो आर्थिक अडचणीत होता, अशी माहिती समोर येत आहे. हरीश हा दारूच्या नशेत सतत कुटुंबियांना त्रास देत असल्यामुळे घरात होणाऱ्या वादामुळे वडील गुलाब (६५) हे कंटाळले होते.

- Advertisement -

सोमवारी रात्री हरीश हा दारूच्या नशेत घरी आला व त्याने पत्नी आणि आई वडिलांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली, या वादातून हरिशने वडिलांच्या दिशेने काचेची बॉटल भिरकावली असता संतापलेल्या वडिलांनी जवळच पडलेला कोयता हरिशच्या डोक्यात घातला, वर्मी घाव बसताच हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्यानंतर देखील वडील गुलाब यांनी त्याच कोयत्याने हरिशवर वार करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वडील गुलाब यांना ताब्यात घेऊन जखमी हरीश गलांडेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी वडील गुलाब याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वपोनी.सुधाकर कांबळे यांनी दिली असून ही हत्या घरगुती कलहातून झाली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -