घरट्रेंडिंगVideo: करोना बाधितांना उपचार देणारे डॉक्टर इतक्या वेळा धुतात हात!

Video: करोना बाधितांना उपचार देणारे डॉक्टर इतक्या वेळा धुतात हात!

Subscribe

डिसेंबर २०१९ रोजी चीनमधील वुहान शहरातून उदयास आलेल्या करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. भारतात तर दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. तसंच आता करोनाचा टाळण्यासाठी अनेक स्तरातून जनजागृती केली जात आहे. सतत हात धुतले पाहिजे, मास्क किंवा रुमालाचा वापर केला पाहिजे अशाप्रकारच्या सूचना सर्वत्र दिल्या जात आहे. सध्या करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी अनेक डॉक्टर दिवस रात्र काम करत आहेत. मात्र हेच डॉक्टर स्वतः काळजी घेण्याकरिता किती वेळा हात धुतात हे तुम्हाला माहित आहे का?

- Advertisement -

याच प्रश्नाचं उत्तर चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने एका व्हिडिओ द्वारे दिलं आहे. डॉक्टर जेव्हा करोना बाधित रुग्णाच्या जवळ जातात तेव्हा आपण पाहिलं आहेत की, त्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पोशाख आणि खूप सारे हॅण्डग्लोज घातले असतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, करोना बाधित रुग्ण असलेल्या अलगीकरण मधून बाहेर आल्यावर ती डॉक्टर पहिल्यांदा हात धुताना दिसत आहे. त्यानंतर तिने शूज कवर काढल्यानंतर पुन्हा धात धुतले. मग तिने हॅण्डग्लोजचा पहिला स्तर काढल्यानंतर हात धुतले, अशा प्रकारे ती डॉक्टर सर्व पोशाखामधील एक-एक गोष्ट काढताना हात धुताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. करोनामुळे डॉक्टरांनी देखील स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागत आहे. आतापर्यंत जगभरात एकूण १ लाख ८३ हजार १९४ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार १६४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच ६ हजार ५०६ करोना रुग्ण हे गंभीर आहेत. तर ८० हजार १७ करोना रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाची खात्रीलायक आकडेवारीसाठी सरकारची अधिकृत वेबसाईट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -